मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर नाशिकच्या शिवसेनेत संशयाचा धुराळा

दिंडोरी येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.
Eknath Shinde with Nashik Shivsena workers.
Eknath Shinde with Nashik Shivsena workers.Sarkarnama

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी मुंबईत बोलतांना मुंबई सोबतच नाशिकचे (Nashik) नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केल्याने शिवसेनेच्या (Shivsena) गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भविष्याचे माहिती नाही; पण सध्या तरी कुणी नसल्याचे स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Local Shivsena leaders firmly claimed, No one will go with Shonde Fraction)

Eknath Shinde with Nashik Shivsena workers.
आमदार सुहास कांदेंना धक्का; गणेश धात्रक शिवसेनेचे झाले जिल्हाप्रमुख!

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षांतर्गत डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी असलेल्या खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकला मेळावा घेऊन नाशिकची शिवसेना जागेवरच असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाची चर्चा विरत नाही तोच बुधवारी शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत त्यांच्यासोबत नाशिकचे नगरसेवक असल्याचा दावा केल्याने पुन्हा एकदा शिवसेनेतील बंडाळीच्या परिणामाकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात बहुमताने आमदार आहेतच सोबत काही खासदारही त्यांच्या मताशी सहमत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या गोटात शिंदे यांच्या दाव्याकडे लक्ष लागून आहे.

Eknath Shinde with Nashik Shivsena workers.
दादा भुसे यांना राजन विचारे शिवसेनेत येण्याचे निमंत्रण देतील का?

दिंडोरीच्या शिवसैनिकांकडून सत्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड होताच येथील जुन्या स्टॅण्ड परिसरात फटाके व गुलाल उधळून स्वागत करण्यात आले होते. विविध कार्यकर्त्यांनी मुंबई गाठत त्यांची भेट घेऊन स्वागत केले. येथील शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले दिंडोरीचे नगरसेवक सुजीत मुरकुटे, नितीन धिंदळे, माजी नगरसेवक सचिन देशमुख, रमेश पाटील, सचिन जाधव, सुरेश वाडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

...सध्या कुणी नाही!

श्री. शिंदे यांनी नाशिकचे नगरसेवक सोबत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याविषयी स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी नाशिकची शिवसेना जागेवरच आहे. नाशिकमधून कुणी जाणार नसल्याचा दावा केला. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सध्या तरी श्री. शिंदे यांच्यासोबत कुणीही नसल्याचे सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in