शिवसेनेला कॉंग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा वाईट दिवस येतील; गिरीश महाजन

संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत, दररोज सकाळी हा भोंगा वाजतो.
शिवसेनेला कॉंग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा वाईट दिवस येतील; गिरीश महाजन
Girish MahajanSarkarnama

जळगाव : महाविकास आघाडीतील पक्षांनी (MVA) आमच्यावर कितीही टिका केली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. त्यांची जनमाणसातील प्रतिमा घसरली आहे. शिवसेनेला तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी पेक्षा आगामी काळात वाईट दिवस येणार आहेत, अशी टिका भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज केली.

 Girish Mahajan
`मी खंडोबाची शपथ घेऊन सांगतो की फक्त फडणविसांनी...`

जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘ शिवसेनेने ‘शॉर्टटर्म’चा विचार करून राज्यात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळविली आहे. मात्र त्यांनी ‘लॉंग टर्म’चा विचार केलेला नाही. त्यांची जनमाणसातील प्रतिमा घसरली आहे, येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षाही शिवसेनेची परिस्थिती अत्यंत वाईट होईल.’’

 Girish Mahajan
भाजपचं सोशल इंजिनिअरींग! राज्यसभेला निम्म्याहून अधिक जागांवर ओबीसी अन् दलित

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टिका केली, महाजन म्हणाले ‘‘ संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत, दररोज सकाळी हा भोंगा वाजतो त्यांच्याकडे राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता याचे कोणतेही प्रश्‍न नसतात.त्यांच्याकडे किरीट सोमय्या, राणा कुंटूब आणि ईडी हेच विषय असतात.’’

 Girish Mahajan
परप्रांतीय ओबीसींची मोजणी नको : मराठा महासंघाने सांगितली कारणे...

राज्यसभेच्या तिसऱ्या जागेबाबत बोलतांना ते महाजन म्हणाले, ‘‘ राज्यसभेची तिसरी जागा आम्ही हमखास जिंकणार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. त्यांना घोडेबाजाराची एवढी चिंता आहे तर त्यांनी त्यांचा तिसरा उमेदवार मागे घ्यावा. घोडेबाजार आम्ही करणार नाही तर महाविकास आघाडीच करेल आम्हाला त्याची गरज नाही.’’

भाजपाने निष्ठावंतांना डावलून दुसऱ्यांनाच राज्यसभेत उमेदवारी दिली, असा आरोप संजय राऊत यानी केला त्याला उत्तर देतांना ते म्हणाले, ‘‘ शिवसेनेने दुसऱ्यावर आरोप करतांना चार बोटे स्वत:कडे आहेत हे लक्षात घेवून बोलावे त्यांनी या अगोदर रामनिवास धूत, प्रितीश नंदी, संजय निरूपम, प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवार दिली होती. हे कोणते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी धंडदांडगे आणि उद्योजकांना उमेदवारी दिली.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in