शिवसेना बांगरांची उचलबांगडी करणार; हिंगोलीचा जिल्हा प्रमुख बदलणार...

यापुढे आम्ही बांगर साहेबांना Santosh Bangar विरोध करण्यापेक्षा भाजपला BJP विरोध On Target करू. कारण बांगर यांना भाजपनेच नेले आहे, अशी भावना शिवसैनिकांनी Shivsena Supporters व्यक्त केली आहे.
MLA Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News, Shivsena News
MLA Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News, Shivsena Newssarkarnama

हिंगोली : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात गेले आहेत. पण त्याचा हिंगोलीतील शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही. सर्व कट्टर शिवसैनिक हे उद्धव साहेबांसोबत राहतील, अशी भावना व्यक्त करून येत्या दोन ते तीन दिवसांत बांगर यांची उचल बांगडी करत नवीन जिल्हा प्रमुख निवडला जाणार असल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.(Hingoli Latest Marathi News)

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे सुरवातीला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगत होते. आता ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. यावरून जिल्ह्यातील शिवसैनिकांत तीव्र संताप उसळला असून या सर्वांनी बांगर यांच्या जाण्याने शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. उलट शिवसेना आणखी ताकतीने उभी राहिल. तसेच जिल्ह्यातील तीन ही आमदार यापुढेही शिवसेनेचेच राहतील, अशी भावना व्यक्त केली आहे.(Santosh Bangar Latest Marathi News)

MLA Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News, Shivsena News
बंडखोरांना शिव्या देणारे बांगर हे आमच्याकडे कसे आले, हे मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितले..

याविषयी शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना संतोष बांगर शिंदे गटात गेले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. कट्टरर शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहेत. शिवसेनेला हा मोठा धक्का वगैरे काहीही नाही. यापूर्वीही असे अनेक धक्के बसले आहेत. या आधी श्री. माने, गुंडेवार, गजानन सुळ, मारूती शिंदे हे सेना सोडून गेले आहेत. तरीही शिवसेनेला काहीही फरक पडलेला नाही.

MLA Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News, Shivsena News
video : परभणीत आमदार संतोष बांगर यांचे जोरदार स्वागत

उलट शिवसेना मोठ्या ताकतीने उभी राहिली आहे. आता जिल्ह्यात आल्यावर संतोष बांगर यांचे स्वागत करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. बांगर यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी बोलले. पण, त्यांना आम्ही तसे झाल्यास जनता आपल्या पाठीशी राहणार नाही. तुम्ही जाऊ नका असे सांगितल होते. आता येणारा काळ शिवसेनेचा राहिल. जिल्ह्यातील तीनही आमदार शिवसेनेचे राहितील.

MLA Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News, Shivsena News
एकनाथ शिंदे सरकारने पालकमंत्री स्थानिकच द्यावेत, ‘या’ सरपंचाची मागणी !

नुकताच जिल्हा संपर्क प्रमुखांचा दौरा झाला यामध्ये सर्वांनी आम्ही शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्याने अनेक वादळे पाहिली आहेत. यापुढे आम्ही बांगर साहेबांना विरोध करण्यापेक्षा भाजपला विरोध करू. कारण बांगर यांना भाजपनेच नेले आहे. ज्या पध्दतीने श्री. बांगर रडले त्यावेळी आम्हालाही वाटले की त्यांची मजबूरी असेल. पण, आता ते शिवसेनेतून गेले आहेत, त्यामुळे त्याच दिवशी विषय संपला आहे, अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.

MLA Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News, Shivsena News
शिवसेना धनुष्यबाणही गमावणार?, उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य,'नव्या चिन्हाची तयारी ठेवा'

संतोष बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविले जाणार का, या विषयी सांगताना कार्यकर्ते म्हणाले, लवकरच जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या होणार असून संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात नवे जिल्हा प्रमुख निवडले जातील, असे सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com