कोळींना जिल्हाबंदी; अंधारेंनाही परवानगी नाकारली : पाटील म्हणतात मी पालकमंत्री असल्याने...

Jalgaon politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात आहे.
Gulabrao Patil, Sushma Andhare
Gulabrao Patil, Sushma Andharesarkarnama

Jalgaon politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात आहे. त्यांची मुक्ताईनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. मात्र, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आमच्या सभेला परवानगी मिळणार व सभा होणारच असा दावा केला आहे.

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा गेल्या चार दिवसापासून जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. त्यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाचे युवा संघटनेचे विस्तारक शरद कोळी ही आहेत. शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांच्या मतदार संघात सभा घेवून त्यांनी जिल्हा दणाणून टाकला आहे.

Gulabrao Patil, Sushma Andhare
Nagpur :नाना पटोलेंचा चतुर्वेदींना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न; अंतर्गत वाद उफाळणार?

शिवसेनेचे युवा संघटनेचे प्रदेश विस्तारक शरद कोळी यांनी जाहिर सभेत प्रभोक्षक भाषण केले म्हणून त्यांना भाषणबंदी व जिल्हाबंदी करण्यात आली. तर आज मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सुषमा अंधारे यांची जाहिर सभेलाही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. याच सोबत शिवसेना शिंदे गटातर्फे आयोजित जाहीर सभेलाही परवानगी नाकारली आहे.

अंबादास दानवे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीच्या भरपाईचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना मुक्ताईनगरला अंधारे यांना सभा घेवू देण्याची विंनंती केली, कोणताही वाद होणार नाही याची हमी आम्ही देता, वाटले तर तुम्ही आम्हाला भाषण लिहून द्या तेच आम्ही वाचून दाखवितो, असेही ते म्हणाले.

मात्र, परवानगी आपण द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास नकार दिला. पत्रकारांशी बोलतांना दानवे म्हणाले, आमच्या मुक्ताईनगरच्या सभेला परवानगी नाकारली असली तरी आमचा परवानगी मिळण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हाधिकारी परवानगी देतील व आमची सभा निश्‍चित होईल. असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Gulabrao Patil, Sushma Andhare
शिवसेनेच्या बंडामागे देवेंद्र फडणवीस असल्याचे उघड : जयंत पाटलांचा घाणाघात

सभा होणार नाही : गुलाबराव पाटील

शिंदे गटाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले, मुक्ताईनगरात ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. आम्हीही त्या ठिकाणी सभेची परवानगी मागितली मात्र, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी आमची परवानगी नाकारली, तसेच त्यांच्या सभेचीही परवानगी नाकारली आहे. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने कायदा व सुव्यवस्था पाळणे कर्तव्य असल्याने आम्ही पोलीसांच्या म्हणण्यानुसार सभा रद्द केली आहे. त्यामुळे त्यांचीही सभा होणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com