मुख्यमंत्री ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला शिवसैनिकांकडून चोप

त्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav Thackeraysarkarnama

जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (uddhav thackeray)यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणं एका युवकाला चांगलच महागात पडलं. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील एका तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संतप्त झालेले शिवसैनिक व महिला पदाधिकारी यांनी जळगावात सेंट्रल मॉल परिसरात या तरुणाचा शोध घेऊन त्याला चांगलाच चोप दिला.

हेमंत दुधिया असे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षपार्ह पोस्ट टाकली, त्यानंतर तो जळगाव येथे खानदेश सेंट्रल येथे चित्रपट पहाण्यास आला, शिवसैनिकांनी त्याला शोधून चोप दिला, त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळी महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Cm Uddhav Thackeray
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला

या तरूणाने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शरद पवार, उद्धव ठकारे, इम्तियाज जलील, याच्याबाबत आक्षेपार्ह अशी पोस्ट आहे. या पाठिमागे राहुल गांधीही दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर हा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. याआधीही आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर अनेकांना मरहाण झाल्याचे समोर आले आहेत.

Cm Uddhav Thackeray
मोठी बातमी : मुख्यमंत्री ठाकरेंच्या विरोधात कॉग्रेस आमदाराची सुप्रीम कोर्टात याचिका

त्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या तरूणाला काही जणांनी पहिल्यांदा घेराव घातला. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याचे दिसते. एका महिलेला या गर्दीत झालेली मारहाण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला त्याची पत्नी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com