Ex MLA Shirish Choudhary & Corporators in Press Confrence
Ex MLA Shirish Choudhary & Corporators in Press ConfrenceSarkarnama

हा घ्या पुरावा.... नंदुरबार पालिकेत मालमत्ता कर वसुलीत कोटीचा घोळ!

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला गंभीर आरोप

नंदुरबार : पालिकेच्या (Nandurbar) मालमत्ता कराच्या वसुलीत कोट्यावधींचा घोटाळा (Scam) झाला आहे. त्याचा हा घ्या पुरावा असे सांगत माजी आमदार शिरीष चौधरी (Shirish Choudhary) यांनी शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी आव्हान दिले आहे. याचवेळी त्यांनी आता शब्द पाळून माजी आमदार रघुवंशी शहर सोडून जाणार का? असा प्रश्न केला.

Ex MLA Shirish Choudhary & Corporators in Press Confrence
सभेला गर्दी होते,पण मते मिळत नाही ; आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं

नगर पालिकेच्या मालमत्ता कराच्या रक्कमेत कोट्यावधीचा घोळ असून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी ते स्वतःच काहीही पुरावे दाखवितात, मात्र ते सर्व बनवाबनवी करीत आहेत. आमच्याकडेही लेखी पुरावे आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एक रूपयाचाही भ्रष्टाचार निघाल्यास गाव सोडून जाईल, असे वचन दिले आहे. आता ते वचन पाळावे, असे आव्हान माजी आमदार चौधरी यांनी दिले.

Ex MLA Shirish Choudhary & Corporators in Press Confrence
तुम्ही जल्लोषात मिरवणूक काढा...पोलिस परवानगीचे मी पाहतो!

नगरपालिका मालमत्ता कराबाबत भाजप व सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा सुरू आहे.काही दिवसापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर, इंदीर मंगल कार्यालय, सी.बी.गार्डन या पालिकेच्या मालमत्ता कर थकीत असल्यावरून भाजपने आरोप केले होते.त्याला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुन्हा कागदे पुरावे पत्रकारांसमोर सादर करीत सडेतोड उत्तर दिले.त्यानंतर एकमेकांचा आरोपानंतर भाजपने दुध का दुध, पाणी का पाणी लवकरच करू, असे आव्हान दिले होते.त्या अनुशंगाने आज माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत माजी आमदार रघुवंशी यांना प्रतिआव्हान दिले.

माजी आमदार श्री.चौधरी पुढे बोलतांना म्हणाले की, श्री रघुवंशी यांनी सांगितले होते की, पालिकेचा मालकीच्या मालमत्तेस कर लागत नाही. असे म्हणत शिरपूर व नवापूर पालिकेचे पत्र दाखविले होते. मात्र पालिकेचा मालमत्तेला कर लागत नाही हे खरे असले तरी पालिका अधिनियमानुसार पालिकेची मालमत्ता जर भाडे कराराने दिली जात असेल तर तिचा कर संबधित संस्थेला भरावा लागतो.तसेच ते म्हणतात, नजर चुकीने यापुर्वी कर आकारला गेला होता. तो कर रद्द करण्यासाठी ठराव केला आहे. असे म्हणत ठरावाची प्रत दिली आहे. मात्र तो ठराव जिल्हाधिकारी व शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा लागतो, तसे पालिकेने केलेले नाही.

त्या संस्थांना मालमत्ता कर भरणे क्रमप्राप्त आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्ही पालिकेने ठरावाची प्रत मंजुरीसाठी मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापुर्वीही तत्कालीन उपजिल्हाधिकारी वान्मती सी यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीराची कर थकबाकी भरण्याचे वसुलीचे आदेश दिले होते.केवळ ठराव करून हुकूमशाही पध्दतीने स्वतःचा व बगलबच्यांचा स्वार्थाचे काम श्री. रघुवंशी करीत असल्याचा आरोप श्री.चौधरी यांनी यावेळी केला. जर पालिकेचा मालकिचा वास्तुंना कर लागत नाही तर व्यापारी गाळे पालिकेचे मालकिचे आहेत.ते व्यापाऱ्यांचा नावावर नाहीत. तर मग व्यापाऱ्यांकडून का पठाणी कर वसुली केला जातो, असा प्रश्‍न उपस्थित केला.तसेच नाट्य मंदिराचे २००७ ते २०२२ पर्यंत केवळ दहा लाखाचे उत्पन्न पालिकेला दाखिविले आहे. ते खोटे आहे. नाट्य मंदिराचे विज बील ग्राहकाकडून वसुल केले जाते.मात्र ते खिशात टाकले जाते. विज बिल मात्र पालिका भरते, हा घोळ नाही का ? स्वतःचा मालमत्ता कर केवळ आठ हजार व सर्वसामान्यांना मात्र दहा हजार ,१५ हजार असे कर आकारले आहेत.

श्री. चौधरी पुढे म्हणाले, निवडणुकीची भिती आम्हाला नाही, गेली दहा वर्ष हिरालालकाका यांच्या मदतीनेच सत्तेत आहेत.आम्ही परजिल्ह्यात जाऊन निवडून येऊ शकतो.असेही सांगितले. पालिकेचे प्रतोद चारूदत्त कळवणकर, नगरसेवक आनंदा माळी, लक्ष्मण माळी, संतोष वसईकर, प्रशांत चौधरी ,भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र माळी आदी यावेळी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com