शिंदखेडा काँग्रेसला खिंडार; तीन नगरसेवक भाजपमध्ये!

तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Congress Corporators
Congress CorporatorsSarkarnama

शिंदखेडा : काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देत शिंदखेडा (Shindkheda) नगरपंचायतीच्या तीन नगरसेवकांनी (Corporators join bjp with there supporters) त्यांच्या समर्थकांसह गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे शहरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सहा नगरसेवक असलेल्या नगरपंचायतीमधील तीन नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर उरलेले तीन्ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा आहे. (Congress corporators join BJP and leaders are not reachable)

Congress Corporators
Shivsena: शिंदे गटाच्या कारकर्त्यांना चोपणाऱ्या रणरागिणींचा शिवसेनेकडून सन्मान

शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना, काँग्रेसला हा फार मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी सकाळी आमदारांच्या दोंडाईचा येथील जनदरबार कार्यालयात नगरसेवकांचा अधिकृत प्रवेश झाला. आमदार जयकुमार रावल यांनी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Congress Corporators
फडणवीसांच्या दत्तक नाशिकसाठी शिंदे गटाची फिल्डींग!

शिंदखेडा शहर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या निवडणुकीत नगरपंचायतीत काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले होते. गेल्या पाच वर्षांत या नगरसेवकांनी शहरात काँग्रेस जिवंत ठेवण्याचे प्रयत्न केले. पक्षाची भूमिका घेऊन सत्ताधारी पक्षाच्या केलेल्या चुकीच्या कामांवर वेळोवेळी हरकत घेत त्यांनी जनहिताची बाजू सक्षमपणे मांडली.

याबाबत अनेक वेळेला नगरसेवकांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे हरकतींबाबत पाठपुरावा केला. मात्र, वरिष्ठ नेत्यांकडून नगरसेवकांना पुरेसे पाठबळ मिळाले नाही. त्यामुळेच पक्षाबद्दल आणि वरिष्ठ नेतृत्वाबद्दल नगरसेवक व समर्थकांमध्ये नाराजी वाढली. याच्याच फायदा घेत भाजपने नगरसेवकांना प्रभागातील विकासकामांना मदत करून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी ठरले. याचाच परिणाम सहाही नगरसेवक काँग्रेसला सोडण्याच्या मनस्थितीत काही महिन्यांपासून होते.

यातील काही नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या मनस्थितीत होते. गेल्या दहा दिवसांपूर्वी या प्रकरणाला वेग आला. बैठका सुरू झाल्या आणि निर्णय घेण्यात आला. मात्र, काँग्रेसच्या गटात दोन विचारप्रवाह निर्माण झाल्याने काही नगरसेवकांनी भाजपचा रस्ता धरला, तर काही शिंदे गटाकडे जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजते. याबाबत काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाशी संपर्क केला असता, ते नॉट रिचेबल होते.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांनी सावध पवित्रा घेतला आहे. नगरसेवकांना आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने प्रलोभने दाखवून काँग्रेसपासून दूर केले, असा आरोप त्यांनी केला. मात्र, त्यांच्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. तेही लवकरच काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. एवढेच नाही, तर या पॅनलप्रमुख दीपक देसले काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक : मीरा मनोहर पाटील, उदय देसले, संगीता सोनवणे व माजी नगरसेवक गणेश भिल. त्यांच्या जाण्याने शहरातील काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत आणि ते तीन्ही काँग्रेस सोडून गेले, तर शहरात काँग्रेस शून्यावर येण्याचे चिन्ह आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com