Dhule News; शिंदे गटाच्या पुढाकाराने विधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू

शिंदे गटाच्या महिला मेळाव्यात धर्मसंस्कारासह हळदी कुंकू, भ्रूणहत्या निर्मूलनावर प्रबोधन
Shinde Group womens
Shinde Group womensSarkarnama

धुळे: (Dhule) धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातर्फे महिलांचा (Women) मेळावा झाला. त्यातील पारंपरिक उपक्रमांमुळे मेळावा लक्षवेधी ठरला. यावेळी विधवा महिलांनाही त्यात सहभागी केले होते. त्यामुळे या विधवांनी समाधान व्यक्त केले. धुळे शहरात पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाल्याचे त्यांनी सांगितले. (Womens meeting in Dhule city of Shivsene Shinde Group)

Shinde Group womens
Gulabrao Patil; गुलाबराव पाटील यांना हवेत अडीचशे कोटी!

या मेळाव्याचे आयोजक शिंदे गटाचे मनोज मोरे, भारती मोरे, संजय वाल्हे, मनिषा वाल्हे यांनी मोगलाई परिसरात धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. नंतर महिला मेळाव्याचे उद्‌घाटन झाले. दोन हजाराहून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम ठेवण्यात आले. महिलांसोबत उपस्थित लहान मुलांचा बोर न्हावनाचा आगळा वेगळा लक्षवेधी कार्यक्रम झाला. उखाणे स्पर्धेतील विजेत्या महिलांना रोख बक्षीसे देण्यात आली.

Shinde Group womens
Congress News; केंद्रातील भाजप सरकारमुळे शेतकरी संकटात

जळगाव येथील ओम साईराम महिला मंडळाने भ्रूण हत्या, तर वैशाली नेवे यांनी लव- जिहादच्या जाळ्यात अडकणाऱ्या तरुणींसाठी विशेष मार्गदर्शनपर विचार मांडले. तसेच सौभाग्याचे लेणं असलेल्या हळदी- कुंकवाचे महत्त्व मेळाव्यात पटवून देण्यात आले. सौ. मोरे व सौ. संजय वाल्हे यांच्यातर्फे भेट वस्तू देण्यात आल्या.

प्रजापिता ब्रम्हाकुमारी परिवाराच्या प्रमिला दीदी व सहकाऱ्यांनी हळदी कुंकवासह धर्म संस्काराचे महत्त्व सांगितले. विधवा महिलांचा मेळाव्यात समावेश केल्याने त्यांना भावना अनावर झाल्या. परंपरेला फाटा देत त्यांचाही सन्मान केल्याने त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

यावेळी छाया चहाकर, स्वाती आगलावे, अनिता दाभाडे, जयश्री चहाकर, सुवर्णा काळे, सीमा वाघ, नीता परदेशी, शीतल काळे, पूनम शेवाळे, कल्याणी कोळी, ज्योती खरात, शोभा माळी, सारिका पवार, पल्लवी सपकाळ, पूनम चव्हाण आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com