शिंदे गटाची आता सरकारी मालमत्तांवर कब्जाची लढाई?

संपर्क कार्यालयावरून राष्ट्रवादी, शिंदे गट आमनेसामने; कार्यालय एक फलक मात्र दोन
Narhari Zirwal Office
Narhari Zirwal OfficeSarkarnama

नाशिक : जून महिन्यात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर (Givernment fall in State) राजकीय परिस्थिती स्थिरस्थावर होत असताना आता सरकारी मालमत्तांवर (Government properties) कब्जाची लढाई सुरू झाली आहे. येथील जलसंपदा विभागाच्या (Irrigation Department) अखत्यारीतील कार्यालयात विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या जनसंपर्क कार्यालयावर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. (Eknath Shinde group now taken drive to take charge of Government premises)

Narhari Zirwal Office
विमानसेवा गुजरातने पळवली?; खासदार काही बोलेना!

राजकीय वाद वाढू नये म्हणून स्वतंत्र कार्यालय असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे.

Narhari Zirwal Office
सुषमा अंधारे जोमात अन् सत्ताधारी एकनाथ शिंदे गट कोमात!

उंटवाडी रोडवर जलसंपदा विभागाचे अखत्यारित जुनी वास्तू आहे. मागील सत्ताकाळात गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना नागरिकांना सहज संपर्क करता यावा यासाठी तेथे महाजन यांनी कार्यालय सुरू केले होते. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ यांची निवड झाली. झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तसेच उपाध्यक्ष हे मोठे पद मिळाल्याने त्यांच्याकडे नागरिकांचा राबता वाढला.

त्यामुळे झिरवाळ यांनीदेखील उंटवाडी रोड येथे कार्यालय थाटले. मात्र, तीन महिन्यापूर्वी राज्यात शिंदे गट व भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. त्यात नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मालेगावचे दादा भुसे यांच्याकडे आली. नाशिक मुख्यालय असल्याने त्यांच्याकडे सातत्याने नागरिकांची ये- जा आहे. त्यामुळे शहरात संपर्क कार्यालय असणे गरजेचे आहे, ही बाब हेरून भुसे यांनीदेखील झिरवळ यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर स्वतःचा फलक लावून कार्यालयावर कब्जा केल्याचे बोलले जात आहे.

उंटवाडी रोड वरून फेरफटका मारल्यास कार्यालय एक मात्र दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्क कार्यालयाचे फरक नजर दर्शनास येत असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in