Jalgaon Politics: उद्धव ठाकरेंची पाठ फिरताच आमदार किशोर पाटील जागे झाले!

Shivsena News: शिंदे गटाचे आमदार आमदार किशोर पाटील यांनी पुतळ्यासमोर आर. ओ. तात्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला
Kishor Patil with Supporters
Kishor Patil with SupportersSarkarnama

Pachora Shivsena News : माजी आमदार तथा निर्मल सीड्सचे संस्थापकीय संचालक (स्व.) आर. ओ. तात्या पाटील हे माझे राजकीय गुरू व राजकीय पिता होते. त्यांच्या एका शब्दावर भविष्याचा कोणताही विचार न करता पोलिसाची नोकरी सोडून त्यांचा राजकीय वारसदार म्हणून आलो. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केला. (MLA Kishor Patil said will fulfil RO patil`s Wish)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाचोरा दौऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांना इशारा होता. त्याने हे नेते खडबडून जागे झाल्याचे चित्र आहे. ठाकरे यांची पाठ फिरताच आमदार किशोर पाटील यांनी आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्यापुढे संकल्प केला.

Kishor Patil with Supporters
Uday Samant : खोक्याची धास्ती...मंत्री सामंत म्हणाले, `खोक्यात काय ते सांगा`

यावेळी आमदार पाटील म्हणाले. मी (कै.) आमदार आर. ओ. तात्या यांची प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनीही मला मुलासारखा जीव लावला. त्यांचे अपूर्ण राहिलेले आमदारकीची हॅट्रिक व खासदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेणार आहे. त्यांनी आर. ओ. पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर हा संकल्प केला.

निर्मल सीड्ससमोरील मायकोरायझा लॅबच्या प्रांगणात व निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. आर. ओ. तात्या पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले. राजकीय विरोधामुळे आमदार किशोर पाटील हे या कार्यक्रमास उपस्थित नव्हते.

Kishor Patil with Supporters
Ajit Pawar News : स्पर्धेत दोघेच, फडणवीसांनंतर भावी मुख्यमंत्री म्हणून नागपुरात अजित पवारांचे पोस्टर…

त्यांनी (स्व.) आर. ओ. तात्यांच्या प्रति असलेली श्रद्धा, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व त्यांचे राजकीय वारसदार म्हणून दुसऱ्या दिवशी आपले कुटुंबीय व समर्थकांसह पुतळास्थळी येऊन अभिवादन केले. यावेळी खुशाल जोशी, केशव नाईक, तुषार जोशी, योगेश देशपांडे, दिलीप देशपांडे उपस्थित होते. आमदार पाटील यांनी आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्यावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पुष्पाभिषेक व पंचामृताभिषेक केला. आपले राजकीय गुरु व राजकीय पित्यास विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी आमदार पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई पाटील, पत्नी सुनीता पाटील, मुलगी डॉ. प्रियंका पाटील, मुलगा सुमित पाटील, रावसाहेब पाटील, मुकुंद बिल्दीकर, सुनील (भुरा आप्पा) पाटील, भाजपचे मधुकर काटे, डॉ. प्रमोद पाटील, महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, उर्मिला शेळके, पंडित चौधरी यांच्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आर. ओ. पाटील अमर रहे’ अशा घोषणा देऊन त्यांचा जयघोष करण्यात आला. (Political Short Videos)

Kishor Patil with Supporters
Gulabrao Patil News : मोठी बातमी! ''...तर काँग्रेससोबत युती करण्यास तयार! ''; गुलाबराव पाटलांचं खळबळजनक विधान

याप्रसंगी आमदार पाटील यांनी आर. ओ. पाटील आमचे दैवत आहेत. त्यांचीच शिकवणूक व आदर्शाप्रमाणे वाटचाल करणार असून, त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे हे त्यांचा राजकीय वारसदार म्हणून माझे कर्तव्य आहे. म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवून मी आमदारकीची हॅट्रिक साधून असून, त्यानंतरच्या निवडणुकीत खासदार म्हणून विजयी होऊन माझ्या दैवताचे स्वप्न पूर्णत्वास नेऊन त्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळवून देणार असल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in