Shivsena rebel : ठाकरेंना सोडलेल्या आमदार चिमणराव पाटील यांना मतदारांचा दणका!

बाजार समितीतील दोन दशकांची सत्ता विरोधकांनी खालसा केली.
Chimanrao Patil
Chimanrao PatilSarkarnama

APMC Result Impact : नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांत मतदारांनी अतिशय चोखंदळपणे मताचा अधिकार बजावला. यामध्ये ठाकरे गट सोडलेल्या आमदार चिमणराव पाटील यांचा मंत्रीपदाबाबत अपेक्षाभंग झाला. आता बाजार समितीतील त्यांची बारा वर्षांची सत्ता गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. सतीश पाटील यांच्या पॅनलने त्यांचा पराभव केला. (Shivsena Shinde Group`s Chimanrao patil defeat in APMC)

पारोळा (Jalgaon) बाजार समितीचा (APMC) निकालाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) डॉ. सतीश पाटील यांचे जोरदार कमबॅक झाले आहे. त्यांनी शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांची बारा वर्षांची बाजार समितीची सत्ता खालसा केली.

Chimanrao Patil
Jalgaon APMC elections : गिरीश महाजन जिंकले मात्र खडसे हरलेले नाहीत!

राज्यात शिवसेनेत फुट पडल्यानंतर आणि जिल्हा परिषद, विधानसभेच्या निवडणुकांआधी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीला महत्तव आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत जनतेत काय भावना आहेत हे जोखणारी ही निवडणूक होती. राज्यात बहुतांश सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता राखली आहे. मात्र अपवाद ठरले ते शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचा आहे. पारोळा बाजार समितीत आमदार पाटील यांचा मुलगा अमोल पाटील यांच्या पॅनला पराभव झाला आहे.

राज्यातील शिवसेना फुटीचा परिणाम पारोळा तालुक्यात दिसून आला. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांचे मतदारसंघावर चांगले वर्चस्व होते. सहकारावरही त्यांची चांगली पकड आहे. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ निवडणुकीत त्यांनी व त्यांचे पुत्र अमोल पाटील यांनी यश मिळविले. याच बळावर त्यांनी बाजार समितीत आपले वर्चस्व टिकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारले.

Chimanrao Patil
Nashik APMC : देविदास पिंगळे यांची शिवाजी चुंभळेंवर दणदणीत मात!

अमोल पाटील यांच्या पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या. विशेष म्हणजे त्यांचे पुत्र अमोल पाटील यांचाही पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. सतीश पाटील यांनी लावलेली जोरदार फिल्डींग यशस्वी झाली. महाविकास आघाडीचे नेते एकत्र आल्याने डॉ. पाटील यशस्वी झाले. गेले काही दिवस राजकारणातून आऊट ऑफ फोकस झालेले डॉ. पाटील यांचे जोरदार कमबॅक झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com