Eknath Shinde; आमचे सर्व आमदार पुन्हा निवडून येतीलच!

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ग्रामपंचायत निवडणुकीचाच कल आगामी निवडणुकांत राहील.
C.M. Eknath Shinde with party workers
C.M. Eknath Shinde with party workersSarkarnama

मुंबई : विरोधक म्हणतात पुन्हा निवडून येऊन दाखवा, मात्र लोक भाजप, (BJP) शिवसेना (Shivsena) युतीच्या आमच्या सरकारवर खुष आहेत. आम्ही लोकाभिमुख कामे करीत आहोत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे तीन हजार 25 आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे (Eknath Shinde Group) एक हजार 595 सरपंच निवडून आले. आगामी निवडणुकांतही हाच ट्रेंड राहील, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. (Eknath Shinde claims all Shinde group`s MLA will reelected in Future elections)

C.M. Eknath Shinde with party workers
Sushma Andhare : माझा घातपात होऊ शकतो...; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

विविध कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे, राजू आण्णा लवटे आदी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी कामाचा धडाका सुरु केलेला आहे. त्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होत आहेत, असे शिंदे म्हणाले.

C.M. Eknath Shinde with party workers
Shivsena; बावनकुळेंना भाजपच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही का?

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकारवर स्थापन झाल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेवर लोक विश्वास दाखवत आहे. शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, वाहतूक सेना, ग्राहक संघटना अशा विविध शाखांतील लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहे. यातून आम्ही जो काही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलातो योग्य होता, असा संदेश यातून मिळत आहे. ही एक चांगली सुरवात आहे.

ते पुढे म्हणाले, पाठींबा मिळण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांच्या मनातले सरकार उत्तम काम करीत आहे, याची पोचपावती आहे. आपल्या सरकारला सहा महिने झाले आहेत. या सहा महिन्यात विविध निर्णय झाले. ते शेतकरी, कामगार, कष्टकरी, वारकरी, शिक्षक, महिला आणि अडचणीत असलेल्या घटकांसाठी निर्णय झाले.

नागपुरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भ, मराठवाड्यासाठी विविध महत्त्वाचे निर्णय झाले. नुकसानग्रस्त धानासाठी 15 हजारांची भरपाई आपण जाहीर केली. खरे तर नागपुरला अधिवेशनच होत नव्हते. सरकार बदलले नसते तर अधिवेशनच झाले नसते, अशी स्थिती होती. कारण चीन, जपानमध्ये कोरोना सुरु झााल होता. आम्ही मात्र पुर्णकाळ अधिवेशन चालले. जे काही निर्णय झाले ते लोकांच्या हिताचे होते.

शिंदे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, विरोधक बॅाम्ब फोडू, अमूक करू अशा वल्गना करीत होते. प्रत्यक्षात ते काहीच करू शकले नाही. खोदा पहाड मात्र चुहा भी नही निकला. फटाके, बाँम्ब सोडा, नागाची गोळीही पेटली नाही. वाजली नाही, कारण आम्ही काम करणारे लोक आहोत. मात्र असा काही आव आणला की सरकारने मोठा घोळ केलेला आहे. जी माहिती विरोधकांनी घेतली ती व्यवस्थित घेतली असती तर बरे झाले असते. ते तोंडवर पडले नसते.

गेले अडीच वर्षे जे बंद झाले होते, ते सर्व सुरु झालेले आहे. भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांचे सरकार उत्तम काम करते आहे. आमचे जे आणदार आहेत, ते त्यांच्या मतदारसंघात लोकाभिमुख काम करीत आहेत. त्यामुळे लोक आमच्या पक्षात येत आहेत. त्याचीच ही पोचपावती आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जो निकाल लागला आहे तो पहा, म्हणजे तुम्हालाही त्याची कल्पना येईल. आमचे लोक खुप काम करतात, कमी सांगतात. इतर लोक थोड काम करतात, खुप मोठे काम केल्याचे दाखवतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com