राज्य सरकार महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करते!

प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने कळवणला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन.
NCP deligation at Kalwan
NCP deligation at KalwanSarkarnama

कळवण : वेदांता- फॉक्सकॉन, (Vedanta Foxcon project) एअरबस- टाटासह (Tata Airbus) सॅफ्रनसारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने कळवण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) वतीने आंदोलन (Agitation) करण्यात आले. या वेळी ‘खोके सरकारचा निषेध असो, उद्योगाचे विमान गुजरातला, (Gujrat) बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला, गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी’ (Maharashtra) अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. (Maharashtra Government takes care of Gujrat instead of Marathi Youth)

NCP deligation at Kalwan
जनतेचे राजे व्हायचे आहे, त्यासाठी शिंदेंबरोबर गेलो!

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारचा निषेध करीत राज्यातील एकनाथ शिंदे सरकार मराठी तरुणांऐवजी गुजरातची काळजी घेत आहे, असा आरोप केला.

NCP deligation at Kalwan
Important: टोलनाक्यावर ७ मिनिटांची मुदत, अन्यथा टोल देऊ नये?

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक उद्योग, सरकारी कार्यालये आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्यावेळी गुजरातला हलविण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसात सर्वप्रथम वेदांता- फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर एअरबस- टाटा सी- २९५ लष्करी वाहतूक विमान हा प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला. यानंतर सॅफ्रन विमान इंजिन दुरुस्ती देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे येणार होता तोही हैदराबादला हलविण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे राज्यातील उद्योग, प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याने अब्जावधीच्या गुंतवणुकीवरुन राज्याला पाणी फिरवावे लागले आहे. वेदांता- फॉक्सकॉनचा प्रकल्प, एअरबस- टाटा, सॅफ्रन प्रकल्पासारख्या अब्जावधी रकमेच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगार निर्मिती होणार होती. परंतु, तसे न झाल्याने महाराष्ट्राची अधोगती होत आहे. शिंदे- फडणवीस सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्रातील तरूण बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभा आहे.

याचा निषेध करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदिप शिंदे, जिल्हा सरचिटणीस संदिप पगार, जिल्हा उपाध्यक्ष सागर खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन करीत तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी योगेश शिंदे, प्रमोद शिंदे, समाधान शिंदे, प्रशांत वाघ, दिनेश पवार, अमोल खैरनार, कुणाल वाघ, रोहन वाघ, समाधान जाधव, शशिकांत हिरे, गोरख देवरे, अतुल पवार, वैभव पवार, अशोक शिंदे, सुनील जाधव, शामराव कदम, रोहित पगार, निलेश देशमुख, पंकज शिंदे, विकास शिंदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील वातावरण व इतर बाबींचा विचार करता उद्योगपती प्रथमतः महाराष्ट्र राज्याला प्राधान्य देतात. परंतु, सत्तेच्या हव्यासापोटी खोके सरकारने राज्यातील वातावरण गढूळ केल्याने, तसेच महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करीत असल्याने महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळविले जात आहे.

- सागर खैरनार, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com