`सांगकामे` शिंदे-फडणवीस सरकार `महाशक्ती`पुढे झुकले!

राज्यातील सरकार गुजरातच्या हितासाठीच काम करीत असल्याने मराठी युवक रोजगाराला मुकले.
Purshottam Kadalag
Purshottam KadalagSarkarnama

नाशिक : सांगकाम्या शिंदे-फडनविस (Shinde-Fadanvis Government) सरकारला महाराष्ट्राच्या (Maharashtra) हिताचे गांभीर्य कळत नाही. महाशक्तीचा आदेश त्यांच्यासाठी सर आखो पर असतो. म्हणून हा प्रकल्प गुजरात (Gujrat) येथे हलविण्याची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते पायाभरणी लवकरच करण्यात येणार आहे. (Prijects will be move to Gujrat till Present state Government in Power)

Purshottam Kadalag
Aditya Thackrey: दिवाळीच्या रेशन किट पुरवठ्यात मोठा घोटाळा!

राज्यातील शिंदे सरकार असेल तोपर्यंत महाराष्ट्राचे प्रकल्प असेच पळवले जातील, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्याचा आशय असा, ज्याप्रमाणे रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे, त्याचप्रमाणे टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे, असे समर्थन हे सरकार करू शकते.

Purshottam Kadalag
टीका करणाऱ्यांना मी नेहमीच कामातून उत्तर देतो

यशवंतराव चव्हाण साहेबांना जेव्हा नाशिकने बिनविरोध लोकसभेवर पाठवलं, तेव्हा ते निवडून आल्यानंतर जिल्ह्यासाठी काही देणं लागतो या उद्देशाने शेतकऱ्यांच्या मुलांना व नाशिककरांना रोजगार मिळावा या हेतूने ओझर येथे मीग विमाने बनविण्याचा कारखाना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या नावाने मंजूर करण्यात आला. हजारो युवकांना रोजगार मिळवून त्यांनी आपल्या निवडीचे नाशिककरांसाठी ऋण फेडले होते.

परंतु २०१४ मध्ये केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गरज नसताना प्रचंड महागाचे राफेल विमान खरेदी करण्यात आले. प्रत्यक्षात जागेवर काहीही नसताना नागपूर येथे त्याच्या मेंटेनन्सचा प्रकल्प काही ठराविक व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी मंजूर करण्यात आला. वस्तूतः नाशिकला ओझर येथे `एचएएल` येथे राफेल विमानाचा मेंटेनन्स जर झाला असता तर लढाऊ विमाने बनविण्याचा अनुभव असणारे कुशल कामगार व एवढी मोठी तयार यंत्रणा `एचएएल` येथे असताना सदर प्रकल्प नागपूर येथे राजकीय हेतूने मंजूर करण्यात आला.

परंतु आजची बातमी कदाचित केंद्राच्या दावणीला बांधलेले शिंदे फडनविस सरकार यांना ठाऊकही नसेल की मराठी माणसाला रोजगार मिळवून देणाऱ्या `एचएएल` या प्रकल्पात २२ हजार कोटीचा टाटा एअरबस विमान निर्मिती प्रकल्प देखिल सहज रीतीने करण्यात आला असता. यापूर्वी नागपूरला प्रकल्प करण्याची घोषणा राबविण्यात आली असती तर महाराष्ट्रातील युवकाला रोजगार मिळाला असता, परंतु या सांगकाम्या शिंदे-फडनविस सरकारला याचं गांभीर्य कळलं नाही. महाशक्तीचा आदेश सर आखो पर म्हणून हा प्रकल्प गुजरात येथे हलविण्याची घोषणा करण्यात आली.

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हजारो युवकांना मिळणारा रोजगार गुजरात येथे हलविण्यात आला आहे, याचा प्रत्येकाने तीव्र निषेध केला पाहिजे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in