Ramdas Athawale: शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही!

रामदास आठवले यांवी ‘रिपाई पक्ष’ सर्व जातिधर्मांसाठी व्यापक करणार असे सांगितले.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama

जळगाव : राज्यात (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सरकार अत्यंत उत्तम पद्धतीने काम करीत आहे. ते कोसळण्याबाबत अनेक जण भाकीत करीत असले तरी ते होणार नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. (RPI chief Ramdas Athawale expects one portfolio in Shinde Government)

Ramdas Athawale
ईडीने काँग्रेस भोवतीचा फास आवळला; पाच नेत्यांना समन्स…

दुसऱ्या टप्प्यात ‘रिपाइं’ला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, पक्ष सर्व जातिधर्मांसाठी व्यापक करण्यास आम्ही आतापर्यंत अपयशी ठरल्याची खंत व्यक्त करून यासाठी आम्ही आता जोमाने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ramdas Athawale
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांचा 'भाव' वधारला

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा मेळावा सोमवारी भुसावळ येथे झाला. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी श्री. आठवले जळगाव जिल्ह्यात आले होते. जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली.

धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळावे

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थिर आहे, ते कोणत्याही स्थितीत कोसळणार नाही. थोड्याफार प्रमाणात नाराजी असते, ती दूर होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना पक्षचिन्हावरून वाद सुरू आहे. मात्र आज शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोनतृतीयांश आमदार आहेत, खासदारही त्यांच्याकडे अधिक आहेत. त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

गांधींना ‘भारत जोडो’चा फायदा नाही

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेबाबत बोलताना आठवले म्हणाले, की काँग्रेसला बळ देण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असली तरी पक्षाला त्याचा फारसा फायदा होणार नाही. देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम नेते आहेत.

खडसेंचे भाजपत स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजपप्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, की खडसे आमचे चांगले मित्र आहेत. ते जर भाजपमध्ये पुन्हा आले तर त्यांचे स्वागतच आहे.

जी.एस. मैदान सभांसाठी द्यावे

शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीचे जी.एस. मैदान पक्षाच्या राजकीय सभांसाठी देणे बंद करण्यात आलेले आहे. याबाबत आठवले म्हणाले, की राजकीय पक्षासाठी सभेचे मैदान देणे बंद केल्यामुळे आम्हाला ‘रिपाइं’चा मेळावा भुसावळ येथे घ्यावा लागला. त्यामुळे हे मैदान पक्षाच्या मेळाव्यासाठी न देण्याचा केलेला ठराव जिल्हा परिषदेने रद्द करावा.

या वेळी आमदार सुरेश भोळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, कार्याध्यक्ष बाबूराव कापसे, चंद्रकांत सोनकांबळे, दिनेश कांबळे, महिला आघाडीच्या संगीता आठवले, आयुब शेख, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com