शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या मुळावर उठले!

एअरबस प्रकल्प प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन केले.
Shivsena agitaion in Dhule
Shivsena agitaion in DhuleSarkarnama

धुळे : राज्यात (Maharashtra) नव्याने दाखल होणारे सर्व प्रकल्प (New Projects) गुजरातमध्ये (Gujrat) जात आहेत. शिंदे- फडणवीस सरकार (Shinde Fadanvis Government) फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. यातून राज्यातील भूमीपुत्रांवर अन्याय होत आहे. टाटाचा एअर बस प्रकल्पही (Tata airbus projets) गुजरातला गेला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackrey Group) येथे निषेध आंदोलन केले. (Shivsena Uddhav Thackrey group agitation against State Government)

Shivsena agitaion in Dhule
RTI ACT; धुळ्यात टोळी सक्रीय, थेट पैशांची होतेय मागणी

टाटा एअऱबस प्रकल्प नुकताच गुजरातला नेण्यात आला. हा प्रकल्प नागपुरला मिहान प्रकल्प, नाशिकला एचएएल येथे त्यासाठी अनुकुलता होती. पुणे येथे हा प्रकल्प व्हावा यासाठी चर्चा सुरु होती. त्याबाबत विविध स्तरावर कारवाई केली जात होती. मात्र अचानक हा प्रकल्प गुजरातला गेला. यापूर्वीही विविध मोठे प्रकल्प गुजरातला गेले. त्यात राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार आहे. हे सरकार राज्याच्या मुळावर उठले आहे, अशी टिका शिवसेनेच्या नेत्यांनी केली.

Shivsena agitaion in Dhule
NCP : राज ठाकरेंच्या सहभाग असलेल्या चित्रपटावर राष्ट्रवादीचा आक्षेप ; नव्या वादाला तोंड फुटले !

प्रकल्प गुजरातला जाण्याने येथील तरुणांना रोजगारासाठी गुजरातचे उंबरठे झिजवावे लागतील. फोक्सकॉनच्या हजारो कोटींच्या प्रकल्पानंतर टाटा एअर बसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. ते केंद्र शासनापुढे मिंधे झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने या भूमिकेचा निषेध करत महापालिकेसमोर प्रतिकात्मक खोके दाखवून आंदोलन केल्याची माहिती सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी यांनी दिली.

यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, देवीदास लोणारी, ललित माळी, भरत मोरे, ज्ञानेश्‍वर फुलपगारे, संदीप सूर्यवंशी, विनोद जगताप, संजय जवराज, प्रवीण साळवे, कुणाल कानकाटे, राजेंद्र देवरे, कैलास मराठे, अनिल शिरसाट, विराज रावळे, बापू नेरकर, नितीन जडे, लक्ष्मण बोरसे आदी आंदोलनात सहभागी झाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in