पॉर्नोग्राफीचा आरोप असलेले राज कुंद्रा शिल्पा शेट्टीसह सप्तशृंगीचरणी!

सप्तशृंगी देवी मंदीरात अभिनेत्री शिल्पा शेट्टी व उद्योजक राज कुंद्रा यांनी दर्शन घेतले.
Shilpa Shetty & Raj Kundra at Sptsrungi temple

Shilpa Shetty & Raj Kundra at Sptsrungi temple

Sarkarnama

वणी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) या दांपत्याने मंगळवारी दुपारी सप्तशृंगगडावर आदिशक्ती सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेतले. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गडावर मोठी गर्दी केली होती.

<div class="paragraphs"><p>Shilpa Shetty &amp; Raj Kundra at Sptsrungi temple</p></div>
राज्यमंत्री भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे विकासासाठी एकत्र!

राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली १९ जुलैला अटक केली होती. त्यानंतर शिल्पाची देखील चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणामुळे चर्चेत आलेले हे दांपत्य गत वर्षी हिमाचल प्रदेशात स्पॉट झाले होते. या कालावधीत दोघांनी जम्मूमधील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी १३ किलोमीटर पदयात्रा केली. तसेच, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात शत्रुनाशिनी माँ बगलामुखी मंदिर (बनखंडी) येथे एकत्र पूजा केली. चामुंडादेवी मंदिर आणि ज्वालामुखी मंदिरात जाऊन दर्शनही घेतले होते. अशा पार्श्‍वभूमीवर दोघे मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास सप्तशृंगगडावर दाखल झाले.

<div class="paragraphs"><p>Shilpa Shetty &amp; Raj Kundra at Sptsrungi temple</p></div>
महापौर उद्धव ठाकरेंचे नाही, किमान प्रविण दरेकरांचे तरी ऐकतील का?

फनिक्युलर ट्रॉलीद्वारे मंदिरात जाऊन ते सर्वसामान्य भाविकांप्रमाणे आदिमायेचरणी नतमस्तक झाले. सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी प्रथमच आल्याचे व आम्ही भगवतीच्या दर्शनाने अतिशय आनंदित झाल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरात केवळ पाच मिनिटे थांबून दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही ट्रस्टच्या प्रसादालयात जाऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थानतर्फे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, नानाजी भामरे यांनी त्यांना आदिमायेची प्रतिमा व प्रसाद देत सत्कार केला.

दरम्यान, सुरवातीला मास्क घातलेले असल्यामुळे शिल्पा शेट्टीला कुणीही ओळखले नाही. मात्र, मास्क काढताच सर्वत्र शिल्पा शेट्टी गडावर आल्याची वार्ता पसरली. त्यामुळे चाहत्यांची भक्तनिवास परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी दूर केली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com