Bharat Jodo यात्रेसाठी 'तिने' एअर इंडियाच्या नोकरीवरही पाणी सोडले...

Bharat Jodo Yatra| राहुल गांधींच्या या यात्रेत तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. राजकीय नेत्यांसह डॉक्टर, इंजिनिअर, वकील, खेळाडू देखील या यात्रेत सहभागी होत आहेत.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra | नाशिक : खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो पदयात्रा सुरु केली. सात नोव्हेंबर २०२२ रोजी ही यात्रा महाराष्ट्रात पोहचली. सुरुवातीपासून यात्रेचे, राहुल गांधी यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या यात्रेच तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. राहुल गांधींच्या या साध्या राहणीकडे तरुणाई आकर्षित झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या भारत जोडो यात्रेत अनेक तरुण तरुण न थकता चालताना दिसत आहेत. याच भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आपल्या नोकरीवर पाणी सोडल्याची माहिती समोर आली आहे. आतिषा पैठणकर असे या तरुणीचे नाव आहे. आतिषा नाशिक रोडची रहिवासी आहे.

तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर आतिषाला एअर इंडियात नोकरी मिळाली. ७ सप्टेंबरला तिच्या नोकरीत रुजू व्हायचं होती. पण याच दिवशी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होणार होती. नोकरीवर रुजू होण्यासाठी ती ६ सप्टेंबरला कोलकाताला जायला निघाली पण ती द्विधा मन:स्थितीत होती. मुंबई विमानतळावर आल्यावरही आतिषाला नोकरी की भारत जोडो यात्रा यापैकी कशाची निवड करायची? याबाबत ती तिच्या मनात प्रचंड अस्वस्थ होती. शेवटी तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

आई-वडिलांना हे कळाल्यानंतर तिला त्यांच्या रोषाचा सामनाही करावा लागला. पण एक महिन्यात आपण परत येऊन पुन्हा नोकरी करु, असा शब्द दि्ल्यानंतर आई वडिलांनी होकार दिला. त्यानंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठले. ''नव्या भारतासाठी भारत जोडो यात्रा अत्यंत महत्वकांक्षी असून या यात्रेच्या माध्यमातून देशभरातील तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेता ल्या. या अनुभवाची ही शिदोरी पुढच्या आयुष्यात मोलाची ठरणार आहे, अशा भावना आतिषाने व्यक्त केल्या.

विशेष म्हणजे भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज सहावा दिवस आहे. राजकीय नेत्यांसह डॉक्टर, इंजिनिअर, वकील, खेळाडू देखील या यात्रेत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेडच्या देगलुरमधून महाराष्ट्रात या यात्रेला प्रारंभ झाला. नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com