`ती`ने भाजपचे संख्याबळ, पोलिस दोघांना आव्हान दिले!

कडेकोट पोलिस बंदोबस्तात साक्रीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड
Police at Sakri election
Police at Sakri electionSarkarnama

धुळे : साक्रीत (Sakri) चाळीस वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले. भाजपने (BJP) नगरपंचयतीत एकहाती सत्ता काबीज केली. मात्र, विजयोत्सवाला अनुचीत घटनेचे ग्रहण लागले. आज (सोमवारी) नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड कडेकोट पोलिस (Police) बंदोबस्तात दुपारी बाराला होत आहे. यावेळी पल्लवी जाधव या मुलीने भाजपचे संख्याबळाचे राजकारण आणि पोलिसांचे प्रचंड बळ दोघांनाही निरुत्तर केले.

Police at Sakri election
हिंदुत्ववादी संघटना दलित, आदिवासींच्या विरोधात!

साक्री नगरपरिषदेत २६ जानेवारी आणि त्यानंतर आता या निवड प्रक्रियेवेळी गोटू जगताप व परिवाराने न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने साक्रीत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. निवड प्रक्रियेपूर्वी सकाळी अकरानंतर मृत मोहिनी जाधव हिची मुलगी पल्लवी न्यायाबाबत जाब विचारण्यासाठी साक्री नगरपंचायत कार्यालयाजवळ उपस्थित झाली. तिथे तिने ठिय्या मांडला. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच गोटू जगतापला त्याच्या घरातच स्थानबद्ध केले आहे.

Police at Sakri election
दिनकर आणि दशरथ पाटील हे सख्खे भाऊ पुन्हा लढणार!

साक्रीकर प्रथमच पोलिस छावणीची स्थिती अनुभवत आहेत. यात भाजपने अज्ञातस्थळी ठेवलेले ११ नगरसेवक धुळ्याहून बसने साक्रीत मतदानासाठी दाखल झाले आहेत.

साक्रीत शंभराहून अधिक पोलीस आणि अधिकारी बंदोबस्तात आहेत. साक्री नगरपंचायतीसाठी १९ जानेवारीला झालेल्या मतमोजणीवेळी साक्रीकरांनी १७ पैकी भाजपला ११, शिवसेनेला ४, काँगेसला १ आणि अपक्षाला १ जागा दिली. या दिवशी सायंकाळी खासदार डॉ. हीना गावीत यांच्या उपस्थितीत साक्रीत भाजप कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सुरु होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत महिला उमेदवाराचा मुलगा गोटू जगताप हा भाजप कार्यालयाजवळ आला. तेथे जगताप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. जगतापला काही भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. ही माहिती जगतापच्या कुटुंबाला समजली. त्यामुळे घटनास्थळी जगतापची बहीण, चुलत बहीण मोहिनी जाधव व त्यांची मुले घटनास्थळी आले. त्यांनी गोटू यांना सोडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जमिनीवर पडून मोहिनी जाधवचा मृत्यू झाला.

या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते मनीष गिते, रमेश सरक, उत्पल नांद्रे व पाच ते सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. नंतर जखमी गोटूने जबाबात संघपाल मोरे, आधार बोरसे, नितीन देवरे, नवनिर्वाचित नगरसेवक ऍड. गजेंद्र भोसले यांची नावे सांगितली. तेव्हापासून सर्व संशयित फरार झाले.

तपास यंत्रणा एलसीबी केवळ संघपाल मोरे, आधार बोरसेला अटक करू शकली. त्यांना नुकताच जामीन झाला आहे. तसेच आज (सोमवार) नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड असल्याने अॅड. भोसले यांना जिल्हा न्यायालयाने अंतरीम जामीन दिला आहे. साक्रीचे नगराध्यक्षपद आदिवासी राखीव झाल्याने जयश्री पवार यांची बिनविरोध निवड जाहीर होईल. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी ऍड. गजेंद्र भोसले व बापू गिते यांच्यात चुरस आहे. या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात विरोधकांनी उमेदवार दिला आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com