Sharad Pawar News : शरद पवारांचा जळगावात धमाका, तीनवेळा आमदार राहिलेला खानदेशातील भाजपचा 'हा' बडा नेता लावला गळाला

Jalgaon NCP Political News : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदार आणि मंत्री अनिल पाटलांसह भाजपलाही दणका...
Sharad pawar, Devendra Fadnavis
Sharad pawar, Devendra Fadnavis sarkarnama

Jalgaon : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचदरम्यान प्रमुख राजकीय पक्षांमधील इन्कमिंग आणि आऊटगोईंगनेदेखील चांगलाच वेग पकडला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्र्वादीतही बंडखोरी उफाळून आल्यानंतर आता राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहे. शरद पवारांनी तर थेट जाहीर सभांचा धडाका लावतानाच आता जळगावातील भाजपचा मोठा नेता गळाला लावला आहे.

Sharad pawar, Devendra Fadnavis
Ashish Deshmukh on Pawar : अनिल देशमुखांसह शरद पवारांवर डॉ. आशिष देशमुखांचे गंभीर आरोप; म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची तिथे जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच पवारांनी जळगावात मोठा धमाका करतानाच भाजपला खिंडार पाडले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघातून तीनवेळा आमदार राहिलेल्या भाजप नेते बी एस पाटील हे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आहे. हा भाजप(BJP) साठी मोठा धक्का मानला जात आहे.

बी एस पाटलांच्या रुपाने पवारांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघातील बडा नेता पक्षात आणून त्यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदार आणि मंत्री अनिल पाटलांसह भाजपलाही दणका दिल्याचे चर्चा आहे.

Sharad pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar On Parliament Session : मोदींनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, मात्र खासदारांना कोणताही अजेंडा दिला नाही; शरद पवारांचा आरोप

खान्देशातील राजकीय वर्तुळात भाजपचे माजी आमदार राहिलेल्या बीएस पाटलांचा मोठा दबदबा राहिलेला आहे. ते तीनवेळा आमदार म्हणून अमळनेर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. पण 2009 च्या निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते स्वगृही भाजपात परतले होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि बी एस पाटील(B S Patil) यांच्यात मतभेद चव्हाट्यावर आला होता. अमळनेरला एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उदय वाघ यांच्या समर्थकांनी बी एस पाटील यांना मारहाण केली होती. यावेळी मंचावर मंत्री गिरीश महाजन हे देखील होते. विशेष म्हणजे फक्त बी एस पाटील हेच नाहीत तर आणखी काही माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे जळगावात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

अजित पवार गटातील अनिल पाटलांना पवारांचा शह...?

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठा गट शिंदे- फडणवीस सरकारमध्ये दाखल झाला. यात अजितदादा उपमुख्यमंत्री तर नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अमळनेरचे आमदारा अनिल पाटील यांचा देखील समावेश आहे. ते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पाटील यांनी अमळनेर बाजार समिती सभापती पदावर दहा वर्ष राजकारण केले. त्यानंतर जिल्हा बँक संचालक म्हणून 15 वर्ष कार्यरत होते. सुरुवातीला ते भाजप पक्षात होते.

Sharad pawar, Devendra Fadnavis
Jalna Lathicharge: फडणवीसांची माफी म्हणजे ‘कोणी केलं, काय केलं, हे आता....’ ; लाठीहल्लाप्रकरणी पवारांचे गृहमंत्र्यांकडे बोट

2014 ला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र मोदी लाट असतानाही अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी हे पाटील यांचा पराभव करुन निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यानंतर आणि पाटील हे राष्ट्रवादी पक्षाच्या मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी देण्यात आली.खान्देशातील राजकारणात त्यांनी एक चांगलं स्थान मिळवले आहे.

आता बीएस पाटलांच्या रुपाने शरद पवारांनी थेट अनिल पाटलांच्या मतदारसंघातलाच बडा नेता गळाला लावल्याने आगामी निवडणुकीत पवार बी एस पाटलांच्या पाठिशी ताकद उभी करुन अनिल पाटलांसमोर कडवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न असणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in