महाजन म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे मला माहित होते!

गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले तर शिवसेना संपेल हे सगळ्यांना माहित होतं.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

नाशिक : उद्धव ठाकरे (Uddhav Thskrey) यांनी अडीच वर्षांपूर्वी भाजपचे (BJP) फोन देखील घेतला नाही. दुसरीकडे शरद पवारांशी (Sharad Pawar) त्यांचे साटेलोटे झाले होते. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) रोज शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असे सांगत होते. खरे तर यानिमित्ताने शरद पवार यांनाच शिवसेना संपवायची होती, म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री करण्यात आले, असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. (Girish Mahajan says everyone knows if Uddhav will CM Shivsena will be finish)

Girish Mahajan
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे शिवसेना आमदारांना नापसंत पडले?

श्री महाजन यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय नियोजनबद्ध टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, शरद पवार मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना माहिती होते, साधा ग्रामपंचायतीची माहिती नसलेला माणुस मुख्यमंत्री झाल्यावर काय होणार. उद्धव ठाकरे देखील आता पवार यांच्या मागे लपत आहेत, मात्र वस्तुतः त्यांना सत्तेचा, खुर्चीचा मोह झाला होता. त्यांचा हा मोह त्यांनी आवरला नाही. त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करून रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवायला पाहिजे होता.

Girish Mahajan
भाजपने बंडखोरांना शिवसेनेच्या दावणीला बांधायचे होते का?

ते म्हणाले, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जो निर्णय घेतला, त्याच आश्चर्य वाटम्यासारखे काहीच नाही आहे. या निर्णयाने कोणीही नाराज नाही. देवेंद्र फडणवीस देखील नाराज नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे सगळ्यांना माहिती होते. शिंदे मुख्यमंत्री होतील याची मला शाश्वती होती. आम्ही भले बाहेर राहू किंवा बाहेरून पाठींबा देण्याचे ठरले.

ते पुढे म्हणाले, मात्र मला देखील ते पसंत नव्हते. कोअर कमिटीत देखील मी माझे व्यक्त केले होते. कारण ते अतिशय अनुभवी व पाच वर्षे त्यांनी उत्तम कारभार केला होता. त्यामुळे माझ्यासारख्या नेत्याला असे वाटत होते की, देवेंद्र फडणवीसांशिवाय पर्याय नाही. आम्ही आग्रह केला. त्यानंतर दिल्लीतून फोन आला. त्यामुळे त्यांनी त्याचा स्विकार केला.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केंद्र सरकारमध्ये वाद किंवा नाराजी असल्याच्या बातम्यांत काही तथ्य नाही. लोक काहीही आरोप करतात. फडणवीस यांनी मी राज्यात फिरून पक्षाचे काम करतो. अशी बांधनी करतो की, पुढच्या निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा पक्षाला मिळाल्या पाहिजे. भाजपमध्ये हेवेदावे, परिवारवाद अजिबात नसतो, असा दावा महाजन यांनी केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in