नरेंद्र मोदींना नको, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा!

देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्यात जनतेचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत.
Devendra Fadanvis Latest News in Marathi, Uddhav Thackeray News
Devendra Fadanvis Latest News in Marathi, Uddhav Thackeray NewsSarkarnama

नाशिक : देशात (Nation) चांगले काम केल्यामुळे जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakare) यांना सल्ला द्यावा. त्यांच्या सल्ल्याची मुख्यमंत्र्यांना आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले. (Devendra Fadanvis Latest News in Marathi)

Devendra Fadanvis Latest News in Marathi, Uddhav Thackeray News
आमदार दिलीप बनकरांना आव्हान, पारदर्शी असाल तर प्रशासकाला का घाबरता?

नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करताना देशाचे मूलभूत प्रश्‍न सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका केली होती.

Devendra Fadanvis Latest News in Marathi, Uddhav Thackeray News
पंकज भुजबळांना धक्का देण्यासाठी सुहास कांदे यांनी आणले दोन आमदार!

त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी केंद्र सरकारपेक्षा राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं चांगलं होईल. महिला, बेरोजगार, बारा बलुतेदारांचे अनेक प्रश्‍न आहेत. त्यामुळे पवारांनी राज्य सरकारला सल्ला द्यावा.

श्री. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करतं आहे. चांगल्या कामामुळे नागरिक मोदींवर खूष असून चांगल्या कामाबद्दल विश्‍वास दाखविला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सल्ला द्यावा, त्या सल्ल्याची गरज त्यांनाच अधिक आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com