शरद पवारांची दुर्मिळ शाब्बासकी, `नरहरी झिरवळांसारखा उपाध्यक्ष पाहिला नाही`

शरद पवार यांच्या हस्ते विधानसभेचे उापध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा सत्कार.
Sharad Pawar, Chhagan Bhujbal & Narhari Zirwal
Sharad Pawar, Chhagan Bhujbal & Narhari ZirwalSarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा नुकताच सत्कार झाला. यावेळी शक्यतो थेट कोणाचेही कौतुक न करणारे पवार म्हणाले, आम्ही त्यांना उपाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र आज अनेक लोक असा उपाध्यक्ष पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया देत आहेत.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal & Narhari Zirwal
शिवसेना नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता खालसा करेल

खेडगाव (दिंडोरी) येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी पवार यांच्या हस्ते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा सत्कार झाला. या सत्कारानिमित्त झिरवाळ यांच्या कर्तृत्वाचा गौरव होत आहे, याचा आनंद आहे, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal & Narhari Zirwal
नाशिकच्या साहित्य संमेलनात ‘मन की बात’वर ओढले ‘आसूड’

ते म्हणाले, त्यांना विधानसभेचे उपाध्यक्षपद द्यायचा विचार झाला, तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आम्ही त्यांनाच उपाध्यक्ष करण्याचा विचार निश्चित केला आणि आज अनेक लोक असा उपाध्यक्ष पहिला नाही, अशी प्रतिक्रिया देत आहेत. त्यांना यापुढील यशस्वी कारकीर्दीसाठी यानिमित्ताने शुभेच्छा देतो.

यावेळी पवार म्हणाले की, नाशिक मध्ये आल्यावर मला आनंद होतो की इथे शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहे. इथले तरूण शेतीत नवीन प्रयोग करत असतात याचा आनंद आहे. अडचणी खूप आहेत सत्ता येते सत्ता जाते मात्र आपण बांधिलकी ठेवली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार श्रीनिवास पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सुधीर तांबे, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय चव्हाण, मारोतीराव पवार, शिरिषकुमार कोतवाल आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in