Sharad Pawar : अगामी निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे एकत्र; पण...पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Sharad Pawar News : भारत जोडो यात्रेत सामान्य माणूस देखील पोहोचला होता.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Sharad Pawar News : महाविकास आघाडीमध्ये अनेक वेळा खटके उडतात. मात्र, येणाऱ्या निवडणुकांध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय असेल, ही आघाडी निवडणुकांमध्येही टिकणार की नाही, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शदर पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट मत मांडले. शरद पवार आज (ता. 8) कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले, आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्यास फार अडचण येणार नाही. २०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट एकत्र तयारी करत आहोत. एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, अजून अंतिम निर्णय झालेला नाही, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sharad Pawar News
Sharad Pawar News : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास; पवार-फडणवीसांना म्हणाले...

भारत जोडो यात्रेबाबत बोलताना पवार म्हणाले, काँग्रेस खासदार राहुल गांधींविषयी (Rahul Gandhi) सत्ताधारी भाजपने कायमच टिंगलटवाळी केली. मात्र, राहुल यांनी भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम हाती घेतली. त्यावरही सुरुवातीला टीका झाली. हा कार्यक्रमात केवळ काँग्रेस पक्षाचाच आहे, असे काही मर्यादित ठेवले नाही. सर्व पक्ष या यात्रेत सामील झाले.

महात्मा गांधींच्या विचारांनी काम करणाऱ्या संस्था भारत जोडो यात्रेत सामील झाल्या होत्या. विशेष म्हणजे, भारत जोडो यात्रेत सामान्य माणूस देखील पोहोचला होता. यात्रेला सामान्यांची सहानुभूती होती. राहुल गांधी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दूषित करण्याचा प्रयत्न भाजपाने केला त्याला या पदयात्रेने प्रत्युत्तर दिले आहे. सर्व विरोधकांमध्ये एक वाक्यता होयला या पदयात्रेचीही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.

तसेच त्यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. राम मंदिराचे काम पूर्ण कधी होणार, याची घोषणा एखाद्या पुजाऱ्याने करायला हवी होती. परंतु, ती घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केली. सामान्य नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांवरुन लक्ष्य विचलित करण्यासाठीच अशा प्रकारचे विषय काढले जातात, असा आरोप त्यांनी केला.

राज ठाकरे काही आरोप करू शकतात. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष कोण होते त्याची यादी बघितली तर. पहिले छगन भुजबळ होते. नंतर काळात मधुकर पिचड होते. ते आदिवासी समाजचे होते. अनेक लोकं होते. ते कोणत्या समाजाचे होते सर्वांना माहीत आहे. ती नावे सांगायची गरज नाही, जातीचा विषय आमच्या मनात येत नाही. आम्ही सर्व शाहू-फुले-आंबेडकरी विचाराचे लोक आहोत. त्यामुळे कोणी काही टीका केली तर आम्ही त्याची दखल घेत नाही.

Sharad Pawar News
Sharad Pawar News : पवारांनी शिंदे गटातील आमदार खासदारांची डोकेदुखी वाढवली; स्पष्टच सांगितले...

बिहार भाजप विरोध डावलून नितेश कुमार यांनी जातीय आधारित जनगणना सुरू केली. अशी जनगणना केली जावी ही मागणी आम्हा सर्वांची अनेक वर्षे आहे. त्यांच्या समाजाचा लहान घटक आहे, त्याची संख्या किती, त्याची स्थिती काय आहे या गोष्टी लक्षात येतात. अशा घटकांना वर आणण्यासाठी काही वेगळे कार्यक्रम घेतले पाहिजे. त्यासाठी जनगणना आवश्यक आहे. हा विचार आम्ही सातत्याने मांडला आहे, असेही पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in