Chhagan Bhujbal News: कर्नाटकच्या मराठी भागात मुख्यमंत्र्यांनी प्रचार करणे योग्य आहे का?

Karnataka Elections: छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांमध्ये कामाची क्षमता, बावनकुळेंकडे काय आहे?
Chhagan Bhujbal & Eknath Shinde
Chhagan Bhujbal & Eknath ShindeSarkarnama

Chhagan Bhujbal Criticize Eknath Shinde: कर्नाटकातील सीमा भागातील मराठी भाषकांवर अन्याय होत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी तीथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या सभा घेतल्या, हे योग्य आहे का?, असा प्रश्न राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. (Chhagan Bhujbal criticize Eknath Shinde on Karnataka assembly election campaign)

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कर्नाटक (Karnataka) सीमावर्ती मराठी भाग सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दुसरीकडे प्रचार केला असतात तर बरे झाले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal & Eknath Shinde
Eknath Shinde News : अपात्रतेचा निकाल येणारच नाही...हे आहे कारण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेसह अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत. ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. शरद पवार दुसऱ्याला कसं पक्षाचा अध्यक्ष होऊ देतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

यावर भुजबळ म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठमोठ्या संस्थांवर प्रमुखपदी जाण्यासाठी तितकी योग्यता लागते. साखर उद्योगात असलेल्या मोठमोठ्या संस्थांवर पवार साहेबांनी काम केले आहे. क्रिकेट क्षेत्रातील देशातील असलेली संस्था बीसीसीआय आणि विदेशात असलेल्या जागतिक क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आहे. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून पु.ल.देशपांडे यांच्यासह इतर साहित्यिकांच्या भाषणांचे एकत्रीकरण करत असून असे चौफेर काम करणारे पवार साहेब अद्वितीय आहे. मात्र इतकी क्षमता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यात नाही, त्यामुळे इतक्या मोठ्या पहाड्यासारख्या व्यक्तीवर बोलू नये असा टोला भुजबळांनी बोलताना लगावला.

Chhagan Bhujbal & Eknath Shinde
Nashik APMC News: बारा संचालकांना घेऊन देविदास पिंगळे गेले अज्ञातस्थळी!

राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा असल्याच्या बावनकुळेच्या व्यक्तव्याचा समाचार घेताना भुजबळ म्हणाले की, दुसऱ्या पक्षामध्ये काय चालू आहे याकडे डोकविण्याची काय गरज आहे. आमच्या पक्षात लोकशाही आहे मला कल्पना आहे की भाजपमध्ये लोकशाही नाही, त्यामुळे दुसऱ्या पक्षामध्ये असलेल्या उणिवांवर बोट तुम्ही ठेवू शकत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये लोकशाही चालते. त्यामुळे कोणी काही बोलले तरी समजूत काढता येते, समजूत काढण्यासाठी आमचे अध्यक्ष शरद पवार हे समर्थ आहेत.

Chhagan Bhujbal & Eknath Shinde
NCP news Nashik : आमदारांचे स्टिकर लावून होणारे गैरप्रकार थांबणार केव्हा?

पक्ष एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्या एवढा अनुभवी नेता हा महाराष्ट्रात तर सोडा देशात नसल्याचे सांगत तुम्ही कर्नाटकमध्ये काही कमी पडत असेल तर तेथे जा तेथे चांगला रिपोर्ट येण्यासाठी प्रयत्न करा,येथे काही भाजपचा चांगला रिपोर्ट येणार नसल्याचे सांगत भुजबळ यांनी टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in