जिवलग मित्राच्या भेटीने शरद पवारही भारावले!

खासदार शरद पवार यांनी नुकतेच एका ऑनलाइन मुलाखतीत बागलाणचे माजी आमदार दिवंगत पंडितराव धर्माजी पाटील यांचा उल्लेख केला
जिवलग मित्राच्या भेटीने शरद पवारही भारावले!
Sharad Pawar With Ramchandra Bapu PatilSarkarnama

सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, (NCP President Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची बागलाणचे नेते व शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्रबापू पाटील (Ramchandra Bapu Patil) यांनी नुकतीच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सदिच्छा भेट घेतली. पाटील यांचे शेतकरी संघटनेच्या चळवळीपासून खासदार पवार यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे व मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे जिवलग मित्राच्या भेटीतून सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने शरद पवार भारावून गेले.

Sharad Pawar With Ramchandra Bapu Patil
संजय राऊत नंतर आले, त्याआधी `सामना`च्या उभारणीत माझे योगदान!

खासदार शरद पवार यांनी नुकतेच एका ऑनलाइन मुलाखतीत लोकनेते, दलितमित्र, बागलाणचे माजी आमदार दिवंगत पंडितराव धर्माजी पाटील यांचा आवर्जून उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा गौरवही केला होता. याचा संदर्भ देताना रामचंद्रबापू पाटील यांनी याबद्दल ‘कसमादे’वासीयांतर्फे पवारांचे ऋण व्यक्त केले. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत नाशिक जिल्हा आपल्यावर मनापासून प्रेम करतो, आपणही जिल्ह्यावरील प्रेम कधी कमी होऊ दिलेले नाही. विरोधकांच्या अपप्रचारामुळे विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा पराभव झाला. मात्र, बागलाणच्या विकासासाठी त्या सातत्याने झटत असतात. त्यामुळे त्यांना राजकीय ताकद देण्याची गरज असल्याचे श्री. पाटील यांनी सांगताच पवारांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.

Sharad Pawar With Ramchandra Bapu Patil
आमदार दिलीप बनकरांनी रानवड कारखाना सुरु करीत शब्द पाळला!

यानंतर रामचंद्रबापू पाटील यांनी शिष्टमंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन सटाणा येथील परिवार संवाद यात्रेत त्यांनी वडील माजी मंत्री दिवंगत राजारामबापू पाटील आणि माजी आमदार दिवंगत पं. ध. पाटील यांच्या आपापसातील स्नेहबंधांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याबद्दल पाटील यांचे आभार मानले आणि ‘आपल्या कार्यशैलीत व व्यक्तिमत्त्वामध्ये दिवंगत राजारामबापू पाटलांची छबी दिसते’ असा गौरवाने उल्लेखही केल्याने प्रदेशाध्यक्ष पाटील खूपच भावुक झाले.

दरम्यान, याच सभेत माजी आमदार दीपिका चव्हाण यांना राजकीय ताकद देण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शब्द दिला होता. त्यानुसार दीपिकाताईंचे नाव पाठविण्यात आले असून, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या चर्चेनंतर लवकरच बागलाण तालुक्यास आनंदाची बातमी मिळेल, असेही श्री. पाटील यांनी शिष्टमंडळास सांगितले.

शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष ज. ल. पाटील, सामाजिक कार्यकर्ते पंडितराव अहिरे, बाजार समितीचे माजी संचालक अनिल चव्हाण, निखिल पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

जयंत पाटील यांची भावुक पोस्ट...

शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील यांनी वडिलांचे स्मरण करून गौरव केल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्राम अकाउंटवर या प्रसंगाचे छायाचित्र शेअर करत ‘तुमच्यामध्ये मला दिवंगत बापूंची छबी दिसते, आजोबांच्या (रामचंद्रबापूंच्या) या उल्लेखामुळे कधी नव्हे इतके मनस्वी समाधान लाभले’ ही भावनिक पोस्टही केली. या पोस्टला सोशल मीडियावर तासाभरातच लाखोंचे व्ह्यूज, तर हजारोंचे लाइक्सही मिळाले. अनेकांनी या प्रसंगावर भावनिक कमेंट्सही केल्या.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in