शरद पवार ब्रीच कॅंडीतून थेट शिर्डीत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दाखल

पवार हे थोडयाच वेळात मार्गदर्शन करणार आहेत. ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कशा प्रकारचे टॉनिक देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मुंबईतील ब्रीच कॅंड रुग्णालयातून थेट शिर्डीत पक्षाच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर दाखल झाले. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Sharad Pawar directly entered Shirdi for NCP convention from breech candy)

ज्येष्ठ नेते पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या तोंडावर आजार पडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते शिबिराला येणार की नाही, याची चर्चा रंगली होती. मात्र, सर्वांचे अंदाज खोटे ठरवत पवार यांनी पक्षाच्या शिबिराच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली हेाती. त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.

Sharad Pawar
आमदार बबनराव शिंदेंनी पंढरपुरात पुन्हा घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनीच शरद पवार हे आज शिर्डीत शिबिराला येऊन मार्गदर्शन करणार आहेत, असे सांगितले होते. त्यानुसार पवार आज शिर्डीतील व्यासपीठावर विराजमान झाले आहेत. पवार हे मुंबईहून थेट हेलिकॉप्टरने शिर्डीत दाखल झाले. विमानतळावरून ते शिबिरात थेट व्यासपीठावर दाखल झाले आहेत.

Sharad Pawar
पवार-शिंदे भेटीत भविष्यातील मोठं रहस्य दडलंय; ती वेगळं काहीतरी देणार : राष्ट्रवादी नेत्याचा बॉम्बगोळा

शरद पवार हे थोडयाच वेळात मार्गदर्शन करणार आहेत. ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कशा प्रकारचे टॉनिक देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com