Politics : 'या' गावचा कारभार आता शरद पवारांच्या हाती

Politics : भाजपला धक्का देत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली
Sharad Pawar, 
Chichondi Patil
Sharad Pawar, Chichondi PatilSarkarnama

Politics : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या सरपंचपदाची शुक्रवारी (दि.२७) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शरद खंडू पवार यांची सरपंचपदी निवड झाली आहे. ही ग्रामपंचायत दोन वर्ष भाजपच्या ताब्यात होती. पण आता चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे.

चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीवर शरद खंडू पवार हे सरपंचपदावर विराजमान झाले आहेत. या निवडणुकीत भाजप (BJP) आणि माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करणारे अशोक कोकाटे व अपक्ष उमेदवार वैभव कोकाटे यांचा पराभव झाला आहे.

Sharad Pawar, 
Chichondi Patil
Nashik Graduate Constituency : नाशिक ‘पदवीधर’बाबत भाजपचं ठरलं : 'हा' निर्णय होणार जाहीर

ही ग्रामपंचायत एकूण १५ सदस्यांची आहे. यापैकी ८ सदस्य १५ दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीने सहलीला नेले होते. त्याचवेळी पवार यांची निवड ठरली होती. मात्र, औपचारिकता बाकी राहिली होती.

दोन वर्षापूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर सव्वा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. मागील १५ दिवसांपूर्वीच भाजपचे तालुकाध्यक्ष तथा गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी राजीनामा दिला. याचवेळी उपसरपंच कल्पना ठोंबरे यांनीही पदाचा राजीनामा दिला होता.

Sharad Pawar, 
Chichondi Patil
Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील म्हणतात, सी व्होटरचे सर्व्हे अंदाज चुकीचे, घरी बसून बनवलेले

त्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली. शुक्रवारी दुपारी २ वाजता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादीचे (NCP) तथा महाविकास आघाडीचे उमेदवार शरद खंडू पवार (Sharad Pawar) यांनी ८ मते घेऊन सरपंचपदावर बाजी मारली. पवार यांची निवड होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com