आमदार सरोज अहिरे शिवसेनेला खरोखर शिंगावर घेतील?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे आणि शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांच्यात विकासकामे कोणाची यावरून श्रेयवाद सुरु आहे.
MLA Saroj Ahire & Ex MLA Yogesh Gholap
MLA Saroj Ahire & Ex MLA Yogesh GholapSarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे (NCP MLA Saroj Ahire) आणि शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप (Shivsena EX MLA Yogesh Gholap) यांच्यात विकासकामे कोणाची यावरून श्रेयवाद सुरु आहे. (Issue creats on Credit of devolopment works) यात श्री. घोलप यांनी व्यक्तीशः अहिरेंना लक्ष्य केले. आमदार अहिरेंनी मात्र थेट शिवसेनेलाच शिंगावर घेतले आहे. त्यामुळे खरोखर देवळालीत शिवसेना एव्हढी क्षुल्लक आहे का? (Really Shivsena so neglected in Devlali) यावरून जाणत्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

MLA Saroj Ahire & Ex MLA Yogesh Gholap
तुम्ही शिवसैनिक तर, आम्ही काय बांगडया भरल्यात काय?

मुलत: हा वाद देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या पाच कोटींचा निधी आणि मुख्यमंत्री सडक योजनेच्या एशीयन डेव्हलोपमेंट बॅंकेच्या निधीतून करायच्या दहा कोटींच्या रस्त्यांचा आहे. त्या कामांचे भूमीपूजन आमदार अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केले होते. त्यात अर्थातच शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रीत केलेले नव्हते. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्ष व यातील विकासकामांची प्रक्रीया आपल्या कारकिर्दीत सुरु झालेली असताना आपल्याला निमंत्रण नाही याचा राग येणे स्वाभाविक आहे. गंमत म्हणजे हा कार्यक्रम झाला त्यानंतर गंगेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. बराच कालावधी झाला आहे. विकासकामे कोणती ही देखील कोणाला दिसलेली नाहीत. त्यावरून त्याचे श्रेय घेण्याचा वाद जन्माला आला.

MLA Saroj Ahire & Ex MLA Yogesh Gholap
गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची लेक धरती देवरेला महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य!

शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी या कामांबाबत दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे देत माहिती दिली. जर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना त्यात मोठा भाऊ आहे. तर माझ्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कामांचे भूमीपूजन करताना मला विश्वासात घेतले पाहिजे, हा त्यांचा रास्त दावा होता. त्यात त्यांनी केवळ आमदार अहिरे यांना लक्ष्य करताना आपला पक्ष शिवसेनेचा आवर्जुन उल्लेख केला. यापुढे असे झाल्यास शिवसेना स्टाईलने कार्यक्रम उधळून लावू असा इशारा दिला होता.

आमदार अहिरे यांच्याकडून त्याची प्रतिक्रीया येणे स्वाभाविक होते. तशी ती आली देखील. त्यांनी काम मंजूर झाले म्हणजे सर्व काही झाले असे होत नाही. या कामांसाठी पुढे मीच पाठपुरावा केला. त्यातून गतवर्षी त्याची प्रक्रीया, निधी, निविदा व कार्यदेश निघाले असा दावा केला. त्यांची देहबोली, टिकेसाठी निवडलेले शब्द पाहिले तर त्यांनी स्वभावाला साजेसा राग अधिक व विचारपूर्वक राजकीय प्रतिक्रीया कमी असेच जास्त वाटले. आमदार अहिरेंनी त्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख केला. `राष्ट्रवादी काँग्रेसने व मी बांगडया भरलेल्या नाहीत` त्यांचे आव्हान होते. आमदार अहिरे म्हणतात, ते खरे असले, तरी कालपर्यंत त्यांनी कधीच राष्ट्रवादीचा उल्लेख केलेला नव्हता. `मी फक्त वैयक्तीक क्षमतेवर निवडून आले` असा त्यांचा दावा असतो, हे प्रत्येकाच्या कानावर गेले आहे. एव्हढेच काय, त्या पक्षाच्या स्थानिक नेते, कार्यकर्ते यांचे फोन देखील घेत नाहीत. त्यांच्या तोंडी फक्त राज्यातील नेत्यांची नावे असतात, अशी तक्रार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोमनाथ बोराडे व अन्य दोन-तीन नावे वगळल्यास त्या पक्षाच्या कोणालाही विचारत देखील नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची मंडळी केव्हाच त्यांच्यापासून दुरावली आहेत. आता त्या दुसरी मोठी चुक करीत आहेत. त्या थेट शिवसेनेला आव्हान देत आहेत. श्री. घोलप यांना आव्हान आणि शिवसेनेला आव्हान यात फरक आहे, याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.

आमदार अहिरे भारतीय जनता पक्षात होत्या. तीथे उमेदवारीची शक्यता जेव्हा पूर्णतः मावळली, तेव्हा शेवटच्या क्षणी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्या व उमेदवार झाल्या. त्यात राष्ट्रवादीसाठी वर्षभर परिश्रम घेऊन घोलप यांच्या विरोधात वातावरण निर्माण करणाऱ्या लक्ष्मण मंडाले यांची उमेदवारी हुकली. यामध्ये विद्यमान आमदारांविषयी नाराजी होती. त्याचा लाभ होऊन अहिरे आमदार झाल्या. ही नाराजी शिवसेनेबाबत होती, असा दावा थोडा धाडसाचा होईल. कारण आजही खासदार, नगराध्यक्ष, नगरपरिषद, सर्वाधिक ग्रामपंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व आहे. तेव्हा शिवसेनेने ठरवले तर अहिरे खरोखर कार्यक्रम करू शकतील का? याचे उत्तर त्यांनीच शोधावे. त्यानंतर `अभ्यासोनी प्रकटावे` हेच बरे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com