अहो सीमाताई चित्रा वाघ होण्याची घाई करू नका!

पोलिसांनी गुन्हा घडताच आरोपीला पकडावे ही भावना सगळ्यांचीच असते.
Anita Bhamre-Seema Hire
Anita Bhamre-Seema HireSarkarnama

नाशिक : पोलिसांनी गुन्हा घडताच आरोपीला पकडावे (Police should arrest Accuse immediate) ही भावना सगळ्यांचीच असते. मात्र भाजप (BJP MLA) आमदार सीमा हिरे (Seema Hire) यांना गुन्हेगारांना पकडण्याशी काही देणे घेणे नाही. त्यांचा हेतू तर फक्त चित्रा वाघ (Chitra Wagh) व्हायचे हाच होता. राज्य सरकारवर खोटे आरोप करीत सुटायचे. मात्र पुरावे मागताच गप्प बसायचे. अहो सीमाताई चित्रा वाघ व्हायची घाई करू नका अंगलट येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी म्हटले आहे.

Anita Bhamre-Seema Hire
बलात्कार करून पळणाऱ्या गुन्हेगारास तासाभरातच अटक!

शहरातील सिडको भागात २७ सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास पॅरोलवर सुटून आलेल्या नितीन पवार या गुन्हेगाराने ब्युटी पार्लर चालवत असलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. या घटनेनंतर शहरात महिलांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे विरोधी पक्षानां साहजिकच सरकार वर शिंतोडे उडवण्याची संधी मिळाली. वास्तविक पाहता घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी अंबड पोलिस ठाणे येथे भेट दिली. गुन्हेगाराला अटक करण्याचे आदेश दिले. आदेश दिल्यानंतर पोलिसांची पथके गुन्हेगाराला पकडण्यासाठी रवाना झाले होते.

Anita Bhamre-Seema Hire
बलात्काराचे राजकारण आमदार सीमा हिरेंना पडले महागात!

श्रीमती भामरे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे. त्या म्हणाल्या, मात्र भाजपच्या नेत्यांनी व आमदार सीमा हिरे यांनी तेव्हढाही वेळ पोलिसांना न देता अंबड पोलिस ठाण्यात आंदोलन केले. यातून पोलिसांना वेठीस धरले. या आंदोलनावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्यांनी गर्दी केली तर थेट कलम १४४ प्रमाणे गुन्हा दाखल होईल असे सहायक आयुक्त सोहेल शेख यांनी सांगितले. त्यांनी पूर्वसूचना देऊन गांभिर्याची जाणीव करून दिली. मात्र त्यावर आम्हाला सल्ला देणारे हे कोण असा आंदोलकांचा संताप अनावर झाला. त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी त्यांचा अविर्भाव, वापरलेले शब्द, आक्रमकता सर्व सीसीटीव्ही तसेच माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालेले आहे. त्यांचे ते आंदोलन लोकशाही मूल्ये, आंदोलनाचे संकेत याला धरून नव्हते. केवळ राजकीय अभिनिवेश व प्रसिद्धीचा स्टंट हाच त्यामागचा हेतू असावा अशी लोकभावना आहे.

Anita Bhamre-Seema Hire
आमदार सुहास कांदे खोटारडे, छोटा राजनचा फोन हा स्टंट?

आमदार हिरे यांनी लक्षात घेतली पाहिजे होते की, आरोपी नितीन पवारने केलेले कृत्य अतिशय निंदनीय आहेच. कोरोना काळात तो पॅरोलवर तुरूंगातून बाहेर आला होता. घटनेनंतर पोलिस आरोपीला शोधत होते. त्यांनी अत्यंत जलद गतीने तो पळून जात असताना त्याला अटक देखील केली. असे असतांना सरकारी कामात अडथळा आणणे उचित आहे काय? हे म्हणजे चित्रा वाघ यांच्यासारखे झाले. बिनबुडाचे आरोप करायचे व पुरावे मागीतले पळून जायचे. फक्त वाहिन्यांवर प्रसिद्धीसाठी वारेमाप आरोप करत सुटायचे. त्यांच्या पायाखाली काय जळत आहे, याचे त्यांना भान नाही. तुमच्या मतदारसंघात जनतेला किती समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विकासाचे कुठले काम नाही याची तुम्हाला जाण नाही.

त्या पुढे म्हणाल्या की, मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असतांना सवंग प्रसिध्द योग्य नाही. कोरोनाचे गांभीर्य न ओळखता गर्दी जमवून आंदोलन करणे काय म्हणायचे. कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर सरकार आपली भूमिका अतिशय ठामपणे मांडत आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यापेक्षा फाशीची शिक्षाच द्या अशी नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची देखील मागणी आहे. तेव्हा काही ठिकाणी पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडू द्या म्हणजे आरोपीला ही शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com