दुसरी लिटमस टेस्ट: बाजार समित्यांच्या जानेवारीत निवडणुका

कोरोनामुळे बाजार समित्यांची मुदत संपून वर्ष उलटले, तरी निवडणुका झालेल्या नाहीत.
दुसरी लिटमस टेस्ट: बाजार समित्यांच्या जानेवारीत निवडणुका
Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb ThoratSarkarnama

संतोष विंचू

येवला : कोरोनामुळे बाजार समित्यांची मुदत संपून वर्ष उलटले, तरी निवडणुका झालेल्या नाहीत. (APMC election postpone due to covid19 apedamic) काही ठिकाणी मुदतवाढ, तर काही ठिकाणी प्रशासक मंडळ सध्या कामकाज पाहत आहे. (In some APMC Administrator took charge) मात्र आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या मुदतवाढीला ब्रेक लावत निवडणुकीचा मुहूर्त निश्चित केला आहे. (Now Election will take place in month of January) त्यानुसार सोमवार (ता. ११)पासून मतदार याद्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील १० हून अधिक बाजार समित्यांच्या मुदत संपल्याने त्यांच्या निवडणुकीचा फड आता रंगणार आहे.

Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat
आमदार सरोज अहिरे अजितदादांशीही खोटे बोलल्या, त्यांना शिवसेनेचा झटका दाखवू!

मागील वर्षी ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. यातील घोटी व येवला बाजार समितीवर प्रशासक मंडळ नेमले आहे. कृषिमंत्र्यांच्या मालेगाव बाजार समितीची मुदत या वर्षी मार्चमध्ये संपली, आशिया खंडातील प्रसिद्ध लासलगाव बाजार समितीची मुदत मेमध्ये संपली आहे. निवडणुकीनिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बनकर, राहुल आहेर, सुहास कांदे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, नितीन पवार, विजय करंजकर, माणिकराव कोकाटे, अनिल कदम, श्रीराम शेटे, देवीदास पिंगळे, अनिल आहेर, शिवाजी चुंबळे या नेत्यांसह त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक वर्चस्वाचे अस्तित्व ठरविणारी असेल.

Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat
नरहरी झिरवाळांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

२३ ऑक्टोबर अथवा त्यापूर्वी मुदत संपलेल्या व या तारखेपूर्वी प्रशासक नियुक्ती झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर कार्यक्रमाप्रमाणे होतील. निवडणुकांसाठी प्रारूप व अंतिम मतदारयाद्या ३० सप्टेंबर या अर्हता दिनांकावर तयार कराण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक २३ ऑक्टोबरनंतर संपुष्टात येणार आहे, अशा समित्यांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र आदेश निर्गमीत करण्यात येतील.

निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकासाधिकाऱ्यांकडून सदस्य सूची मागविण्याची प्रक्रिया सोमवार (ता. ११) ते शुक्रवार (ता. २२)पर्यंत पूर्ण करायची आहे. प्रारूप मतदारयादी तयार करण्यासाठी सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सोमवारी (ता. २५) सुपूर्द करावी. सचिवाने विहित नमुन्यातील प्रारूप मतदारयादी ३ नोव्हेंबरपर्यंत तयार करावी व सचिवाने विहित नमुन्यातील प्रारूप मतदारयादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत द्यायची आहे. कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामपंचायत व सोसायटीच्या राजकारणालाही पुन्हा एनर्जी मिळणार आहे.

प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासंदर्भात लवकरच सूचना निर्गमित होऊ शकतील. ज्येष्ठ्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी व सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वांना बळ दिले आहे. त्यात जनता नक्कीच त्यांच्यावर विश्वास व्यक्त करतील.

- माजी खासदार देविदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती.

असा आहे कार्यक्रम

-पारूप मतदारयादी प्रसिद्ध : १० नोव्हेंबर

-अंतिम मतदारयादी प्रसिद्ध : ६ डिसेंबर

-उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती : १६ ते २२ डिसेंबर

-अर्ज छाननी : २३ डिसेंबर

-माघार : २४ डिसेंबर ते ७ जानेवारी

-मतदान : १७ जानेवारी

-मतमोजणी : १८ जानेवारी

...

Related Stories

No stories found.