ठासून सांगा `आपण सर्व गांधीदूत`

शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीत महात्मा गांधींना अभिवादन
Congress office bearers at Gandhi Jayanti programme
Congress office bearers at Gandhi Jayanti programmeSarkarnama

नाशिक : आज गांधीजींच्या (Mahatma Gandhi) देशात (India) महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच उदात्तीकरण करणारा चित्रपट ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये. आज आपण सर्वांनी ‘आपण सर्व गांधीदूत आहोत, हे ठासून सांगण्याची गरज आहे, असे मत काँग्रेस (Congress) पक्षाचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी व्यक्त केले.

Congress office bearers at Gandhi Jayanti programme
वीजपुरवठा खंडीत केल्याने शेतकरी पोहोचले आमदारांच्या दारी

ते म्हणाले, महात्मा गांधीजींच्या विचारांनी संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. आपल्या देशाची ओळख महात्मा गांधीजींच्या नावाने होते. सत्य-अहिंसा- सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते, हे त्यांनी आपल्या लढ्यातून दाखवून दिले आहे. त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस सलोखा-अहिंसा व शांतता दिवस म्हणून पाळला जातो; पण काही भरकटलेले व स्वार्थी लोक समाजाला भ्रमित करू पहात आहेत.

Congress office bearers at Gandhi Jayanti programme
शेतकरी आंदोलनातून आमदार राहुल ढिकलेंचा राष्ट्रवादीला ‘शॉक’

काँग्रेस या चित्रपटाविरोधात आक्रमक झाली असून, त्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस कमिटीत आदरांजली वाहण्यात आली. सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष श्री. आहेर यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनास काँग्रेसचा विरोध असून, त्याच्या प्रदर्शनाबाबत सामूहिक निषेध करीत असल्याचे सांगितले.

यावेळी श्री. आहेर यांच्यासह माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, सेवा दलाचे शहराध्यक्ष अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, आर. आर. पाटील, अल्पसंख्याक शाखेचे अध्यक्ष हनिफ बशीर, युवक शाखेचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, ब्लॉक अध्यक्ष नीलेश (बबलू) खैरे, अण्णा मोरे, गौरव सोनार, सुवर्णा गटकळ, निशिकांत कदम, राजकुमार जेफ, दाऊद शेख, दर्शन पाटील, सोमनाथ मोहिते आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com