
नाशिक : (Nashik) पदवीधर निवडणुकीत आज दोन महत्त्वाचे राजकीय निर्णय झाले. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवारी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी जाहीर झाली. अपेक्षेप्रमाणे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना काँग्रेसने (Congress) पक्षातून निलंबीत केले आहे. या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांनी आपण अपक्ष उमेदवार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे. (Congress rebel Satyajeet Tambe will be the Independent candidate in Nashik Graduate constituency election)
शिवसेनेने पाठींबा दिलेल्या शुंभांगी पाटील आता महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असतील. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता महाविकास आघाडीच्या शुंभांगी पाटील आणि अपक्ष सत्यजीत तांबे यांच्यात प्रमुख लढत होईल.
निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता प्रचाराला गती येईल. श्री. तांबे तसेच आमजदार डॉ. सुधीर तांबे व त्यांच्या समर्थकांनी यापूर्वीच प्रचार सुरु केला आहे. सत्यजीत तांबे आज नगरमध्ये प्रचार करीत होते. तर शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत सायंकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. सध्या निवडणुकीत सोळा उमेदवार असले तरीही मुख्य उमेदवार व त्यांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आज हे घडले...
महाविकास आघाडीने आज तिन्ही सहकारी पक्षांच्या चर्चेनंतर पाठिंबा देण्याबाबतचा गोंधळ संपवला. गेले दोन-तीन दिवस यावर खल सुरू होता. मात्र निर्णय झाला नव्हता. आज मुंबईमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी संयुक्तपणे शुभांगी पाटील यांना पाठींबा जाहीर केला.
निवडणुकीची पार्श्वभूमी...
सत्यजीत (Satyajeet Tambe) यांचे वडील डॉ. सुधीर तांबे नाशिक (Nasik) पदवीधर मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. याही वेळी कॉंग्रेसने (Congress) त्यांनाच उमेदवारी दिली. बी फॉर्मसुद्धा दिला. पण त्यांनी ऐनवेळी उमेदवारी दाखल केलीच नाही. उलट सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पाठिंबा मिळावा यासंदर्भात सत्यजीत तांबे यांनी त्यांची भेट घेतल्याची चर्चा होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.