`या`मुळे उच्चशिक्षीत सरपंच शीतल नंदन यांना झाली अटक!

ताहाराबाद ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
Sarpanch Sheetal Nandan
Sarpanch Sheetal NandanSarkarnama

नाशिक : वित्त आयोगाच्या (Financial Commission) मंजूर झालेल्या निधीत (Funds) प्रत्यक्ष काम न करता, केवळ प्रशासकीय स्तरावर वर्क ऑर्डर देण्यात आल्या होत्या. त्याची कामे न होताच पैसे अदा केल्याच्यी तक्रारी होत्या. त्याची चौकशी होऊन जिल्हा परिषद (Z.P.) प्रशासनाला अहवाल आला होता. त्यामुळे सरपंच शीतल नंदन (Sheetal Nandan) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. एका उच्चशिक्षीत महिला सरपंचाकडून झालेल्या या गैरव्यावहारामुळे तो चर्चेचा विषय होता. (Highly qualified women sarpanch involved in corruption)

Sarpanch Sheetal Nandan
NCP News: देश विकायला भाजपला बारामतीची जागा हवी आहे का?

ताहाराबाद ग्रामपंचायतीला विविध विकासकामांसाठी शासनाकडून आलेल्या १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सरपंच शीतल नंदन यांना मंगळवारी जायखेडा पोलिसांनी अटक केली. दुपारी त्यांना सटाणा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Sarpanch Sheetal Nandan
Co-operative : थकबाकीदारांच्या नातेवाईकांच्या ठेवीतून कर्जवसुली

१९ एप्रिलपासून अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेऊनही जामीन न मिळाल्याने अखेर सरपंच शीतल नंदन जायखेडा पोलिसांना शरण आल्या.

बागलाणचे गटविकासाधिकारी यांच्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिस ठाण्यात सरकारी निधीत अफरातफर व भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सरपंच शीतल योगेश नंदन, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. १६ ऑगस्टला ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके याला अटक झाली आहे. मात्र, सरपंच शीतल नंदन फरारी झाल्या होत्या. मंगळवारी सकाळी त्या जायखेडा पोलिसांना शरण आल्या. नंतर पोलिसांनी त्यांना सटाणा न्यायालयात हजर केले असता, ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हवालदार सुनील पाटील तपास करीत आहेत.

शीतल नंदन गेल्या चार महिन्यांपासून फरारी झाल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर अफरातफर व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने व पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या सबळ पुराव्यांमुळे त्यांना सुप्रीम कोर्टानेही अटकपूर्व जामीन नाकारल्याने त्यांनी स्वतः आत्मसमर्पण केले.

-श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जायखेडा

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com