सरपंच लीना पाटील यांनी नदीलाही फोडला पाझर!

मोरझर येथे ‘जलसमृद्धीतून विकासाकडे’ या उपक्रमांतर्गत लेंडी नदीपात्राच्या दोन किमी खोलीकरण करण्यात आले.
Leena Patil & Villagers
Leena Patil & VillagersSarkarnama

नांदगाव : गावाचा कारभारी कृतिशील असला की असाध्य ते साध्य होते. त्यातही गावची सरपंच महिला असेल अन् या प्रयत्नांना इच्छशक्तीची जोड मिळाल्यावर सांघिक शक्तीतून त्याची फलश्रुती कशी असते, याचा वस्तुपाठ मोरझरच्या (ता. नांदगाव) सरपंच लीना पाटील (Leena Patil) यांनी दाखवून दिला आहे. सौ. पाटील यांच्या प्रयत्नातून दोन किलोमीटर नदीपात्राचे (River basin) खोलीकरण (Deepen) करण्यात आले. त्यामुळे मोरझरच्या जलसाठ्यात आता लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. (Lady Sarpanch initiative for deepen the river)

Leena Patil & Villagers
`एसटी`चे तुघलकी फर्मान; ज्येष्ठांच्या सवलतीचे वय ६५ वर्षे!

कायम दुष्काळाचा शाप असलेल्या या गावात जलस्रोत असूनही त्यातील जलसाठा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी हा उपक्रम झाला. गावाला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढता येऊ शकते, हे सरपंच लीना पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्या योजनेची यशस्वी अमलबजावणी करण्यासाठी केलेल्या नियोजनातून हे शक्य झाले. त्यामुळे त्या जिल्ह्यातील एकमेव महिला सरपंच ठरल्या आहेत.

Leena Patil & Villagers
मनसे नेत्यांना अटक करणारी महिला पोलिस लाच घेताना अटक!

दुष्काळग्रस्त तालुक्याच्या दक्षिण भागातील मोरझर गावात सरपंच लीना पाटील यांनी ‘जलसमृद्धीतून विकासाकडे’ या उपक्रमांतर्गत जलसाठा समृद्ध करण्यासाठी गावातील लेंडी नदी व सिमेंट बंधारे, पाझर तलावातील गाळ काढून खोली वाढविण्याच्या कामात चुणूक दाखविली. युवा मित्र या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यातून त्यांनी हे काम उभे केले. टाटा ट्रस्ट व गॅलक्सी या दोन संस्थांनी यासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला.

दोन महिन्यांपूर्वी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्यात आले. त्यात साधारण नदी, नाले, सहा सिमेंट बंधारे, तीन मातीनाला बांध असे एकत्रितपणे एकूण दोन किलोमीटरपर्यंत खोलीकरणाचे काम झाले. शिवाय शेतकऱ्यांनी गाळ वाहुन नेत जमिनी सुपीक बनवल्या. साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. त्यामुळे वर्षानुवर्षे साचणारा गाळ उचलला गेला. यापूर्वी साचणाऱ्या गाळामुळे गावातील पिण्याच्या पाण्यासाठी तसेच, शेतीच्या पाण्यासाठी तलावाचा उपयोग होत नव्हता. खोलीकरण वाढले व संभाव्य जलसाठ्याच्या क्षमतेत देखील या कामामुळे वाढ होण्यास मदत होणार आहे. युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरझर येथील गावाजवळील नदी खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ दोन महिन्यांपूर्वी करण्यात आला होता.

सरपंच लिना पाटील यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मोठे काम करुन घेत आपल्या कामाची चुणूक दाखविली अशा शब्दात युवामित्र संस्थेचे अधिकारी तुळशिराम घागरे यांनी गौरवोद्‌गार काढले. जिल्ह्यातील सरपंचांनी श्रीमती पाटील यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी केले. सरपंच श्रीमती पाटील यांनीही युवामित्रच्या सर्व आधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले.

युवामित्र संस्थेच्या अधिकारी मनीषा पोटे, ऋषिकेश डांगे, तुळशीराम घागरे, अमोल काळे तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळेच मोरझर येथे मोठ्या प्रमाणात नदी-नाले, बंधाऱ्यांचे खोलीकरण करु शकलो. त्यासाठी ग्रामस्थांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले. शिवाय आमदार सुहास कांदे, ज्येष्ठनेते बापूसाहेब कवडे व समाधान पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले.

- लिना पाटील, सरपंच, मोरझर

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com