उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने तक्रार करायला जागाच नव्हती.

आता धनुष्यबाण कोणाचा हे निवडणूक आयोगाने ठरवावे असे गुलाबराव पाटील म्हणाले.
Gulabrao Patil
Gulabrao PatilShivsena

जळगाव : उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) जेव्हा पक्षप्रमुख होते, तेव्हा त्यांना आम्ही सांगू शकत होतो. तक्रार करू शकत होतो. मंत्री, मुख्यमंत्री (Chief Minister) आमचे ऐकत नसतील तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी आम्हाला ती एक जागा होती. जेव्हा तेच मुख्यमंत्री झाले, तेव्हा ती संधी गेली. ही सगळ्यांची अडचण असल्याने आमदारांनी शिवसेना(Shivsena) पक्ष सोडला, असे बंडखोर गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले. (Rebel Gulabrao Patil said, they bonded us to leave Shivsena)

Gulabrao Patil
आदित्य ठाकरे गर्जले : प्रेम व विश्वासाचे अपचन झाल्याने त्यांना आमच्यावर राग

बंडखोर गटाचे आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंना आम्ही नेता मानत होतो, परंतु शेवटी नेत्यानेही कार्यकर्त्यांचे ऐकले पाहिजे. गाव पातळीवर सरपंच त्याच्या सदस्यांचे ऐकतो. जिल्हा परिषद सदस्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष ऐकतो. नगरसेवकांचं नगराध्यक्ष ऐकतो. आमदारांचं मुख्यमंत्र्यांनी ऐकले पाहिजे. ज्यावेळेस ते पक्षप्रमुख होते, तेव्हा आम्हाला कुठे तरी जागा होती की, हा मंत्री ऐकत नाही, हा मुख्यमंत्री ऐकत नाही, आता तेच मुख्यमंत्री झाले तर आम्ही सांगायचे कोणाला?

Gulabrao Patil
सत्तांतर नाट्यानंतर आमदार किशोर पाटील ‘ॲक्शन मोड’वर

गुलाबराव पाटील यांनी यानिमित्ताने आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, माझा व्यक्तीगत यामध्ये कोणताही अडचणीचा विषय नव्हता. अडचणीचा विषय जे पहिल्यांदा निवडूण आलेले आमदार आहेत, त्यांचा आहे. त्यांची फार खदखद होती. वारंवार ते वेगवेगळ्या मार्गाने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मी जाणारा चौतीसावा आमदार होतो. मी त्यांना सांगत होतो, अजुनही वेळ गेलेली नाही. त्यांना बोलवा. पण त्यांनी काहीच केले नाही.

आम्हाला जायला सांगितले, असा आरोप पाटील यांनी केला. ते म्हणाले. यासंदर्भात जेव्हा संजय राऊत आम्हाला म्हणाले, तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही देखील जा. चार लाख लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांना तुम्ही हलकट सारखं सांगता की, तुम्ही निघून जा. तेव्हा आम्ही देखील विचार केला की, मंत्रीपद गेलं खड्ड्यात. आम्ही मंत्रीपद सोडून निघून गेलो. आज लोक सरपंचपद लवकर सोडत नाही, आम्ही मंत्रीपद सोडले, तेव्हा लक्षात घ्या, किती तीव्रता असेल.

ते पुढे म्हणाले, आता ही लढाई आमच्या किंवा कोणाच्याच हातात नाही. निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे. आमदार, खासदार आमच्याकडे जास्ती आहे. तेव्हा ते ठरवतील अधिकृत चिन्ह कोणाचे. आम्ही नगरसेवक जमा करतो आहे. कार्यकर्ते जमवतो आहे. पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. ते चिन्हच आम्हाला वाचवायचे आहे. या बाणाला संपवण्याचा प्रयत्न जो काही लोकांनी सुरु केला होता, ते आम्हाला नको होते. आम्ही शिवसेना हायजॅक करीत नाही आहे. शिवसेना भवन, शिवालय आम्हाला हायजॅक करायचे नाही आहे. ते उद्दव ठाकरे यांच्याकडेच ठेवायचे आहे. आम्हाला फक्त शिवसेना वाचवायची आहे.

संजय राऊत यांच्यावर टिका करीत ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हे जमले असते, पण काय करणार चहापेक्षा किटली गरम अशी स्थिती आहे. ज्यांनी आयुष्यात कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही, फक्त हातवारे करून भाषण तर मला देखील येते. त्यांच्यापेक्षा जास्त चांगल बोलता येते. मात्र शेवटी, साहेबांनी या लोकांना आवर घालायला पाहिजे होते.

मला शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही. मी ते करणार नाही. शेवटी पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल, असे श्री. पाटील म्हणाले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in