राऊतांनी बंडखोरांची अक्षरश: लायकी काढली

Sanjay Raut| Nashik| दोन-चार लोक गेल्याने शिवसेना संपणार नाही,
Sanjay Raut| Nashik|
Sanjay Raut| Nashik|

नाशिक : दोन-चार लोक गेल्याने शिवसेना संपणार नाही, पण बेडखोरांनी शिवसेना सोडली असं जाहीर करावं. गेलात तर सुखात राहा, पण सेनेचं नाव का घेता? असा सवाल शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यात शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संवाद साधताना बंडखोर आमदारांचा समाचार घेतला.

काय म्हणाले संजय राऊत?

''कोण होता तुम्ही आणि आम्ही. पण शिवसेनेमुळे आज आम्ही खासदार, आमदार, मंत्री झालो, शिवसेना ही चार अक्षर पाठिशी नसती तर नगरपंचायतीतही निवडून येणं कठीण झालं असतं. पण त्यांनी पाठित खंजीर खुपसला. आता हा वाद ईमान आणि बेईमानीचा आहे. या बंडखोरांची आमदार व्हायची लायकी नव्हती, असा सणसणीत टोलाही संजय राऊतांनी लगाावला.

Sanjay Raut| Nashik|
Bjp : खासदार चिखलीकरांची चव्हाणांवर टीका, पण एका गोष्टीसाठी केले कौतुक..

बंडखोर गेले तरी शिवसैनिकाला कोणी पळवून नेऊ शकत नाही. चाळीस आमदार म्हणजे शिवसेना नाही. १०० आमदार आणि पंचवीस खासदार परत निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जन्माला घातली आणि शिवसेना आमच्याच बापाची आहे. अशा परखड शब्दांत राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

२०१४ मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने ६५ जागा जिंकल्या. शिवसेना पाच जागाही जिंकू शकत नाही, असा भाजपला विश्वास होता. पण शिवसेनेचे मंत्री म्हणून बरेच लोक आज त्याच हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सरकारमध्ये यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. तेव्हा त्यांना ते हिंदुत्व आठवले नाही. २०१९ मध्ये अमित शहा स्वत: मातोश्रीवर आले होते. त्याचवेळी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं ठरलं होतं. पण निवडणुकीनंतर भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला धोका दिला. तेव्हा चाळीसपैकी एकाही आमदाराचा आत्मा जागा झाला नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in