Sanjay Raut : शिंदे सरकारचे आयुष्य जास्तीत जास्त ९० दिवसच!

खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलीच चपराक लगावली.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut News : शिंदे व फडणवीस गट उसने अवसान आणून ढोलताशांच्या गजरात नाचत आहेत. परंतु एक मात्र निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली लक्ष्मणरेषा विधानसभा अध्यक्षांनादेखील ओलांडता येणार नाही. नव्वद दिवसांत राज्य सरकार पडेल, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut have a confident that Shinde Government will fall soon)

नाशिकमध्ये (Nashik) खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) दिलेला निकाल सर्वसामान्यांना स्पष्ट शब्दांत कळणारा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सरकार लवकरच कोसळणार हे निश्चित.

Sanjay Raut
Parambir Singh News : परमबीर सिंग यांना पगार मिळेल पण सेवेत येणार नाहीत!

सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निर्णयाचे चुकीच्या पद्धतीने शिंदे व फडणवीस गटाकडून विश्लेषण केले जात आहे. सर्वसामान्यांनाही कायदा कळतो, तेथे चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलेले आहेत. परंतु राज्यात सत्तेत असलेले लोक आमच्याच बाजूने निकाल लागला, असं खोटं अवसान आणून चुकीच्या पद्धतीने निकालाचे विश्लेषण करत आहेत.

कोर्टाने अशा पद्धतीने निकाल दिला आहे, की शिंदे व फडणवीस गटाला नागडं करून विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले आहे. न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. शिंदे गटाने नियुक्त केलेला प्रतोद व त्याने बजावलेला व्हीप चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारची प्रत्येक कृती बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाचे निकालातून स्पष्ट होते. गटनेतेपदी शिंदे यांची केलेली निवड देखील बेकायदेशीर ठरविली आहे.

Sanjay Raut
Karnataka Election Result 2023 Live : कर्नाटकात भाकरी फिरणार ? ; BJP ला सुरुंग लागणार की काँग्रेस बाजी मारणार?

खासदार राऊत म्हणाले, न्यायालयाच्या निकालाने एव्हढे नागडे करूनही नाचणं म्हणजे बेशरमपणाचे आहे. देवेंद्र फडणवीस वकील असल्याचे एकले आहे. सर्वसामान्यांना जेथे कायदे कळतो, तेथे त्यांना कळू नये, हे लाजिरवाणे आहे. मूळ पक्षातून फुटलेले लोक पक्षावर दावा करू शकतं नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या वतीने सोळा आमदारांना अपात्र करावे, अशी याचिका दाखल केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in