हो, कोर्ट आमच्यासाठी आहे! राऊत आणि वळसे पाटलांच्या शंकेवर भाजप आमदाराचे उत्तर

ठराविक राजकीय पक्षाला न्याय व्यवस्थेकडून दिलासा कसा मिळतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट
Bjp Mla Sanjay Kute News, Sanjay Kute on Sanjay Raut, Sanjay Kute on Valse Patil
Bjp Mla Sanjay Kute News, Sanjay Kute on Sanjay Raut, Sanjay Kute on Valse PatilSarkarnama

जळगाव : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल माध्यमांशी बोलताना देशाच्या न्यायव्यवस्थेवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ठराविक राजकीय पक्षाला न्याय व्यवस्थेकडून दिलासा कसा मिळतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट असल्याचे हे दोन्ही नेते म्हणाले होते. आज त्यांच्या याच शंकेवर भाजपचे आमदार संजय कुटे (sanjay Kute) यांनी उत्तर दिले असून हो कोर्ट आमच्यासाठी आहे, आम्हाला बऱ्याच गोष्टी तिथून शक्य आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (BJP MLA Sanjay Kute News updates)

संजय कुटे बोलताना म्हणाले, "आम्हाला माहीत आहे, शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आमच्या विरोधात कितीही वापरल्या तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टातून आम्हाला न्याय मिळतो. कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात. आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करणार आहोत," असे म्हणतं कुटे यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांना व प्रशासनाला ठणकावलं. कुटे यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून कोर्टाबद्दल त्यांना इतका आत्मविश्वास कसा हा प्रश्न विचारला जात आहे.

Bjp Mla Sanjay Kute News, Sanjay Kute on Sanjay Raut, Sanjay Kute on Valse Patil
नवा आदेश : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणखी लांबणीवर..

यावेळी कुटे यांनी गेल्या काही दिवसात शेगाव शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत काही घटनांवरुन जळगाव पोलिसांवर गंभीर आरोप केले. शेगाव शहर व ग्रामीण पोलीसच कायद्याचा दुरुपयोग करून शांतताप्रिय शेगाव शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करत याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शेगाव शहरात धरणे आंदोलन करण्यात येणार असून येत्या सोमवार पासून जिल्हाभर तहसील कार्यालयात निवेदने देणार येणार असल्याचेही संजय कुटे यांनी जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com