Congress keep power : घोटीत शेतकरी विकास पॅनलची सत्ता

घोटी बाजार समितीत सत्ताधारी गुळवे, जाधव पॅनलला सोळा जागा, परिवर्तन पॅनलला दोन जागा
Sandip Gulve
Sandip GulveSarkarnama

Igatpuri APMC result news : घोटी बाजार समितीच्या निवडणुकीत लोकनेते (स्व) गोपाळराव गुळवे प्रणीत शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले. तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले. (Ruling congress keep the power in Ghoti APMC election)

लोकनेते (स्व) गोपाळराव गुळवे प्रणीत शेतकरी विकास पॅनल नेतृत्व काँग्रेस (Congress) नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, (NCP) शिवसेना (Shivsena) उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी केले.

Sandip Gulve
Nashik APMC Result : ना महाविकास आघाडी, ना भाजप, मतदारांचा प्रस्थापितांना कौल

घोटी बाजार समितीची निवडणूक (APMC election) अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. त्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी एकत्र येत पॅनेल केले. काँग्रेसचे (Congress) विद्यमान आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांच्यासाठी हा निकाल सुखद ठरला.

या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या पॅनेलला मोठी मदत केली. या मतदारसंघात काँग्रेस व शिवसेना हे पारंपारीक राजकीय शत्रु आहेत. मात्र ते एकत्र आल्याने राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे व भाजप गटाला संधी मिळाली नाही.

Sandip Gulve
Sinnar APMC election : आमदार कोकाटेंच्या सत्तेला धक्का; वाजे, कोकाटेंना समान जागा!

सोसायटी सर्वसाधारण गटातून निवृत्ती जाधव, सुनील जाधव, शिवाजी शिरसाठ, हरिदास लोहकरे, अर्जुन पोरजे, रमेश जाधव, भाऊसाहेब कडभाने, महिला राखीव गटातून सुनीता गुळवे, आशा खातळे, ओबीसी गटातून राजाराम धोंगडे, व्हीजेएनटी गटातून ज्ञानेश्वर लहाने, व्यापारी गटातून भरत आरोटे, नंदलाल पिचा तर हमाल गटातून रमेश जाधव विजयी झाले आहेत.

(स्व) रामभाऊ शिरसाठ प्रेरित शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार दिलीप चौधरी विजयी झाले. मात्र एका जागेसाठी फेरमोजणीचा अर्ज आल्याने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी जैन भवन येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com