`अमित ठाकरे आजारी होते तेव्हा उद्धव यांनी मनसेचे नगरसेवक फोडले होते...`

Uddhav Thackeray interview :संदीप देशपांडे यांनी खिल्ली उडवली.
Uddhav Thakrey & Sandeep Deshpande
Uddhav Thakrey & Sandeep DeshpandeSarkarnama

मुंबई : शिवसेनेने (Shivsena) मनसेचे (MNS) सहा नगरसेवक फोडले, तेव्हा अमित ठाकरे (Amit Thakre) आजारी होते. राज ठाकरे (Raj Thakrey) त्यात व्यस्त होते. त्यामुळे शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडले, आज शिवसेनेचे आमदार फुटले. हे सर्व उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांच्या कर्माची फळे आहेत, अशी टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केले. (MNS leader sandeep Deshpande criticoised Uddhav Tharey`s interview)

Uddhav Thakrey & Sandeep Deshpande
फक्त चर्चेनेच सुरु झाला लताबाई सोनवणे यांच्या मंत्रीपदाला विरोध!

सामनाचे संपादक, खासदार संजय राऊत यांनी श्री. ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्याबाबत ते बोलत होते. ते म्हणाले, वसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आजची मुलाखत मला तरी आवडली नाही. आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरे, सगळं आपलं घरचा मामला होता. आता ते पालापाचोळा म्हणतील. कोणाला खंजीर म्हणतील. त्याचेही लोकांना अप्रुप राहिलेले नाही.

Uddhav Thakrey & Sandeep Deshpande
मंत्र्यांची यादी तयार, २९ जुलैला मंत्रीमंडळ विस्तार?

ते म्हणाले, आज ज्याला तुम्ही पालापाचोळा म्हणता, तो अडीच वर्षे तुमच्याबरोबर घट्ट होता ना. तेव्हा तो चांगला होता. मुळात विषय असा आहे, अडीच वर्षे झाली संपत्ती कमवून, आता पुढची अडीच वर्षे सिम्पथी कमवायची, त्यासाठी ही मुलाखत होती. आपण जर पाहिलं तर, नियती ही तीच चक्र पुर्ण करत असते. जी गोष्ट तुम्ही लोकांबरोबर केली, आज तीच तुमच्याबरोबर घडते आहे. त्यामुळे कर्माची फळे इथेच भागायची असतात. तेच तुम्ही भोगत होते. मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा शिवसेनेचे लोक सर्जीकल स्ट्राईक, सर्जीकल स्ट्राईक असे बोंबलत फिरत होते. आता तुम्हाला आमदार फुटले तेव्हा सिम्पथी हवी आहे का?.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांबद्दल आज तुम्ही म्हणता आहेत, की बाळासाहेब शिवसेनेचे आहेत. जेव्हा बाळासाहेबांचे स्मारक करण्यासाठी महापौर बंगला मागीतला, तेव्हा ते सर्वांचे होते. मग आजच कसे ते फक्त शिवसेनेचे झाले, असा प्रश्न त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे मी देशातील पाच उत्कृष्ठ मुख्यमंत्र्यांपैकी एक होतो, असे म्हणतात. त्यांना पाच पैकी एक मुख्यमंत्री केले, ती संस्था कोणती. त्या संस्थेने त्या आदी तसेच त्या नंतर कोणता सर्व्हे केला आहे का?. तुम्हीच तुमच्या संस्था निर्माण करायच्या अन् बेस्ट सीएम घोषीत करून घ्यायचे असा हा प्रकार आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in