समीर भुजबळ ठरले नाशिकच्या संमेलनाचे यशस्वी किमयागार!

उत्तम व्यवस्था, नियोजनाचे कोंदण असलेले संमेलन जगभरात २५ लाख रसिकांपर्यंत पोहोचले.
Sameer Bhujbal & Chhagan Bhujbal
Sameer Bhujbal & Chhagan Bhujbal Sarkarnama

नाशिक : आधी कोरोना, त्यानंतर ओमायक्रॅान व्हेरिएंट, ऐन संमेलनात बेमोसमी पाऊस अन् वादासाठी संधी शोधणारे विरोधक अशा अडचणीच्या मालीकांवर मात करीत ९४ वे मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाले. उत्तम नियोजन, नाविण्यपूर्ण कल्पना यातून ते फक्त देशातच नव्हे तर जगभरातील पंचवीस लाखांहून अधिक रसिकांपर्यंत पोहोचले. याचे बहुतांश श्रेय जाते, ते राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना.

अर्थात बॅक ऑफिसची सूत्रे हलविणाऱ्या, अगदी लहान सहान गोष्टीतही आपली सौदर्य दृष्टी पणाला लावणाऱ्या समीर भुजबळ यांचे नाव चर्चेत आलेच नाही. मात्र यंत्रणेतील सर्वांनाच त्यांचा भक्कम आधार होता.

Sameer Bhujbal & Chhagan Bhujbal
शरद पवारांची दुर्मिळ शाब्बासकी, `नरहरी झिरवळांसारखा उपाध्यक्ष पाहिला नाही`

लोकहितवादी मंडळाने अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचा संमेलन नाशिकला व्हावे अशी मागणी केली. मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने साहित्य संमेलन नाशिकला घेण्यास परवानगी देखील मिळाली. पुढे संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना स्वीकारण्यास विनंती करण्यात आली. त्यांनी तो मान स्वीकारला. त्यानंतर हे संमेलन अधिक उजवं कसे होईल यासाठी आपसूकच सर्व जबाबदारी समीर भुजबळ यांनी घेतली आणि ती यशस्वीरित्या पेलली देखील.

Sameer Bhujbal & Chhagan Bhujbal
५४ टक्के समाजाला प्रतिनिधीत्व नसणे हा अन्याय ठरेल!

संमेलन नाशिकला होणार म्हटल्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष तयारी देखील सुरु केली. परंतु पुढे कोरोनाची दुसरी लाट आल्याने हे संमेलन पुढे ढकलण्यात आले. पुढे हे संमेलन होईल की नाही यावर देखील चर्चा होऊ लागली. दिवाळीच्या अगोदर कोरोनाचे सावट काही अंशी दूर झाल्याने शासनाने नियमावली शिथिल केल्यावर पुन्हा एकदा संमेलनाच्या चर्चा सुरु झाली. संमेलन समन्वयकाची बैठक होऊन नाशिक मध्ये ३, ४ व ५ डिसेंबर रोजी संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. तारखा निश्चित झाल्यांनतर संमेलनाच्या तयारीसाठी एक महिन्यांहून कमी कालावधी मिळाला होता. त्यामुळे या संमलेनाचे हे शिवधनुष्य पेलणे तसं सोपे नव्हते.

संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर अखेर संमेलनाच्या तयारी जोरदार सुरु झाली. स्वतः स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सातत्याने बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. संमेलनाचे स्थळ मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे निश्चित झाल्यानंतर याठिकाणीच्या सर्व कामकाजात माजी खासदार समीर भुजबळ यांनी सूक्षम नियोजन सुरु केले. यासाठी रात्रंदिवस कामकाज सुरु झाले. संमेलनासाठी जर्मनचा भव्य मंडप उभा करण्यात आला. परुंतु संमेलनाच्या दोन दिवस अगोदर नाशकात जोरदार पावसामुळे संमेलनावर पावसाचे सावट निर्माण झाले होते. अशा वेळी संमेलनस्थळी पर्यायी व्यवस्था देखील माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. संमेलनस्थळी पावसापासून बचावासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या.

संमेलनाच्या ठिकाणी भव्य अशी सजावट करण्यात आली. आकर्षण रोषणाईमुळे संमेलनस्थळ अतिशय सुंदर झाले. पावसामुळे संमेलनस्थळी नागरिक किती प्रमाणात सहभाग होतील असा प्रश्न होता. मात्र संमेलनाच्या यशस्वी नियोजनामुळे नागरिकांनी या संमेलनास भरभरून प्रतिसाद दिला. बाहेरून आलेल्या पाहुण्यासाठी तसेच साहित्यिकांसाठी अतिशय सुंदर व्यवस्था याठिकाणी करण्यात आली. भव्य असे पुस्तकांचे दालन उभे करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे हजारोंच्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले.

या संमेलनासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून संमेलन जगभरात पोहचले. अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा मराठी भाषिकांनी संमेलन बघितले. परदेशातून देखिल साहित्यिक आणि कवींनी या संमेलनात सहभाग नोंदविला. त्याचाच परिणाम म्हणजे २० लाखांहून अधिक लोकांनी संमेलन सोशल मिडीयाच्या माध्यमातून बघितले. संमेलनासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे बाहेरून आलेल्या सर्व साहित्यिक आणि रसिकांनी या संमेलनाच्या नियोजनाचे कौतुक केले. खुद्द साहित्य महामंडळाने देखील या संमेलनाच्या नियोजनाचे स्वागत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी देखील स्वागताध्यक्ष छगन भुजबळ व नियोजनात रात्रंदिवस काम केलेल्या माजी खासदार समीर भुजबळ व त्यांच्या टीमचे भरभरून कौतुक केलं.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com