संभाजीराजे म्हणाले, `फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, ते पंतप्रधान होतील`

महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न सर्वांनी एकत्र येऊन सोडवावा
Sambhajiraje & Devendra Fadanvis

Sambhajiraje & Devendra Fadanvis

Sarkarnama

चाळीसगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना उज्ज्वल भविष्य आहे. ते भविष्यात पंतप्रधान (Prime Minister) देखील होऊ शकतील, असे खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सर्व संघटनांनी एकाच छताखाली येऊन काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

<div class="paragraphs"><p>Sambhajiraje &amp; Devendra Fadanvis</p></div>
संजय राऊतांचा नाशिक दौरा फलदायी... सेनेत इनकमिंग सुरू...

ते म्हणाले, संपूर्ण देशात महाराष्ट्राची ओळख ही दुसऱ्या राज्यांपेक्षा वेगळी आहे. असे असताना आज महाराष्ट्रात विशेषतः आरक्षणाच्या संदर्भात जे काही सुरू आहे, ते पाहून मनाला बोचते. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मग ते सत्ताधारी असो की विरोधातले, अशा सर्वांनी एकत्र येऊन या तिढ्यातून एकदाचे बाहेर काढा, असे आवाहन राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

येथील पालिकेतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

<div class="paragraphs"><p>Sambhajiraje &amp; Devendra Fadanvis</p></div>
खडसे-पाटील हा तर जुना वाद, तो चर्चेतून सुटेल!

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक दाखले देत सांगितले, की महाराष्ट्र ही अनेक संत-महंतांची भूमी आहे. बहुजनांची चळवळ इथेच सुरू झाली. अशा महाराष्ट्रात आज अडचणी निर्माण झाल्या आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी भांडतो आहे. दिल्लीत जेव्हा आम्ही सर्व खासदार एकत्र येतो तेव्हा काय चालले आहे महाराष्ट्रात, यावर चर्चा होते. त्यामुळे एकदा सर्वांनी एकत्र येऊन आरक्षणाचा तिढा सोडवावा, असे आवाहन केले.

खासदार संभाजीराजे यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील गड-किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, यासाठी तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार लेखी स्वरूपात सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे. फोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून किमान ५० किल्ल्यांचे तरी संवर्धन व जतन आपण करू, असे सांगून सध्या महाराष्ट्र अडचणीत असला तरी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला अडचणीतून बाहेर काढू, असा विश्‍वास व्यक्त केला.

यावेळी खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे, संजय सावकारे, चंदुलाल पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com