
Dhananjay Munde News : सबंध राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पिके हातची गेली आहेत. शेतकऱ्यांची झोप उडाली असून, ते संकटात आहेत. मात्र, कृषिमंत्री उत्तर सभांतून भाषणे ठोकण्यात व्यस्त आहेत, अशी टीका स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांनी केली. (Farmers in tthe state are in drought crisis but Minister have nothing to do)
महाराष्ट्रात (Maharashtra) दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मदतीची गरज आहे, परंतु राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) हे मात्र उत्तर सभा घेऊन भाषणे करण्यात धन्यता मानतात, अशी नाराजी संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी व्यक्त केली.
गरीब मराठ्यांना बाहेर का ठेवलं?
स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमासाठी ते नाशिकला आले आहेत. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज उभा आहे. गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवलं, या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, ही बाब दुर्दैवी आहे. मागच्या सरकारला आणि सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारलाही आम्ही जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, पावसाअभावी शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त असून, आत्महत्या वाढत आहेत. राज्यात बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मात्र, त्याच जिल्ह्यातील कृषिमंत्री धनंजय मुंडे उत्तर सभा घेण्यात व्यस्त आहेत.
ते पुढे म्हणाले, ब्रिटिशांच्या कार्यकाळात तयार केलेले कृषी धोरण आजही अस्तित्वात आहे. यात अजिबात बदल झालेला नाही. सरकारने यासंदर्भात दीर्घकालीन धोरण अमलात आणायला हवे. मात्र, सध्या राजकारण सुरू आहे.
लोकांना राजकारणात कुठलाही रस नाही, त्यांची कामे होणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे सध्याचे आव्हान आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने बैठकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं, याचे स्वागत आहे. भावना व न्याय भूमिका यांचा समन्वय साधावा, अशी अपेक्षा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.