NashikNews; ऑनलाईन जुगारात कोटीचा गंडा बसलेला संभाजीराजेंचा परिचित कोण?

संभाजीराजे म्हणतात, ऑनलाईन गेम्सपासून युवा पिढीला वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama

नाशिक : ऑनलाईन गेम्स अर्थात रमी व अन्य स्वरुपातील जुगाराच्या जाळ्यात शेकडो लोक अडकले आहेत. अनेकांना हे व्यसन जडल्याने कर्जबाजारी झाले. `यामध्ये माझ्याशी परिचय असलेल्या एका वैज्ञानीकाला कोटीचा गंड बसला. त्याची आयुष्याची पुंजी गेली. त्यामुळे सगळ्यांनी सावध व्हावे` अशी सुचना छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केली. (Youth & Many get caught upin Online games temptation)

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati : 'आता बस्स झालं..' म्हणत संभाजीराजेंनी दंड थोपटले ; महाराष्ट्रात राजकीय गणितं बदलणार..

संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस काल झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत `महाराष्ट्राची दशा आणि दिशा` हा परिसंवाद झाला. यावेळी विविध प्रश्नांवर सुचना करण्यात आल्या.

Sambhajiraje Chhatrapati
NCP News; योगेश पाटील यांचा राजीनामा छगन भुजबळांना धक्का ठरेल?

यावेळी मानसोपचार तज्ञ व समुपदेशक शैलेंद्र गायकवाड यांनी ऑनलाईन जुगारचा विषय हा गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. अनेक युवकांनी त्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले. या गेम्समुळे खेळणाऱ्यांत पॅथॉलॉजीकल गॅम्बलींग डीसऑर्डर निर्माण होते. त्यात डोपामाईन कींवा सतत मोठी रक्कम जिंकण्याचे व्यसन किंवा शाश्त्रीय शब्दांत `बीग्वीन टेम्पटेशन` तयार होते. त्यात अनेक युवक, युवती कर्जबाजारी झाल्यात. आत्महत्या होतात. त्यामुळे याबाबत सगळ्यांनी त्याला गांभिर्याने घेण्याची सूचना केली.

उपस्थितांत ही चर्चा सुरु असतानाच अस्वस्थ झालेले छत्रपती संभाजीराजे देखील अस्वस्थ झाले. त्यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत त्यावर सहमती व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्याबरोबर शिक्षण घेतलेल्या एका जवळच्या व्यक्तीलाही त्याची झळ बसली आहे. तो विज्ञान क्षेत्रात काम करीत होता. त्याने आयुष्यात कमावलेले सर्व कोटी-दोन कोटीची बचत या गेम्समध्ये गमावले. त्याचा विचारल्यावर कन्येचा विवाह करायचा होता. त्यासाठी पैसे हवेत म्हणून त्या मोहात पडल्याचे त्याने सांगितले. या गेम्सपासून सगळ्यांनीच दूर राहिले पाहिजे. हे गेम्स मोबाईलवर असल्याने कोण काय करतो हे लक्षात देखील येत नाही. त्यामुळे ज्याला ज्याला शक्य असेल त्याने याबाबत प्रबोधन करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

ऑनलाईन गेम्सचे अनेक अॅप आणि सॉफ्टवेअर सध्या सहज मोबाईलवर उपलब्ध होतात. विविध अभिनेते देखील त्याच्या जाहीराती करतात. त्यामुळे तरूण वर्ग त्याकडे आकर्षित होते. त्याच्या जोडीला गेम्स खेळण्यासाठी ऑनलाईन पैशांचे आमिष देखील असते. त्यामुळे एक मोठा वर्ग ऑनलाईन गेम्सच्या मोहात अडकला आहे. यावर उपस्थितांतील अनेकांनी चिंता व्यक्त करीत हा सध्याचा गंभीर प्रश्न आहे. त्यानु समाजात विकृती व प्रश्न निर्माण होत असल्याने त्यात लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी माजी महापौर प्रकाश मते, डॉ. अतुल वडगावकर, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे रवींद्र सपकाळ, मुरलीधर पाटील, उगले, पियुष सोमानी, शैलेंद्र गायकवाड, कुणाल पाटील, जयप्रकाश जातेगावकर यांसह विविध मान्यवरांनी सुचना केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com