नाशिक लोकसभेसाठी संभाजीराजेंची पेरणी?; खासदार गोडसेंसमोरच मुख्यमंत्र्यांपुढे मांडले प्रलंबित प्रश्न

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती नाशिकमधून लोकसभेची आगामी निवडणूक लढवणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसले तरी नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी मांडलेल्या गाऱ्हाण्यामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
Sambhaji Raje
Sambhaji RajeSarkarnama

नाशिक : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) नाशिकमधून (Nashik) लोकसभेची आगामी निवडणूक (Loksabha Election) लढवणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसले तरी नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे त्यांनी मांडलेल्या गाऱ्हाण्यामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. केंद्र सरकारशी संबंधित असलेले प्रश्न खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्यासमोर त्यांनी मांडल्याने संभाजीराजे विरुद्ध गोडसे अशी लढत नाशिककरांना बघायला मिळेल, असा तर्क लावला जात आहे. (Sambhaji Raje raised the issue of air service with forts in Nashik before the Chief Minister)

एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती नाशिकमध्ये एका व्यासपीठावर आले होते. या वेळी संभाजीराजे यांनी केलेल्या भाषणाला नाशिकच्या विकासाची धार चढल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

Sambhaji Raje
‘वैभव नाईक कितीही मोर्चे काढा; हे शिंदे-फडणवीस सरकार आहे, चुकीला माफी नाही’

नाशिक जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कोल्हापूर खालोखाल नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गड व किल्ले आहे. पर्यटनाची मोठी संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहे. सर्वगुण संपन्न असलेल्या नाशिकच्या पर्यटनाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त करत फोर्ट फाउंडेशन सोबत राज्य सरकारने सामंजस्य करार करून संस्थेच्या ताब्यात दिल्यास किल्ल्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Sambhaji Raje
लहान भाऊ पोहायला शिकला अन्‌ मला रात्रभर झोपच लागली नाही : अजितदादांची तुफान फटकेबाजी

छत्रपती शाहू महाराज व नाशिकचे जवळचे संबंध राहिले आहेत. पिंपळगाव बसवंत येथील गणपत मोरे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या समाजकारणाला शाहू महाराजांनी ताकद दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. अवकाळी पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला असून, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Sambhaji Raje
क्षीरसागरांचा चकवा कोणाला? : शिवसेनेत असूनही कार्यक्रमाला शिंदे-फडणवीसांना बोलावले!

नाशिक विकासाच्या मुद्द्यांना हात

संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नाशिकचे प्रश्न मांडले. येत्या ३० ऑक्टोबरपासून उडाण योजनेंतर्गत सुरू असलेली विमानसेवा बंद पडणार असल्याने त्यात राज्य सरकारने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. विमानसेवा सुरू असल्यास पर्यटनालादेखील चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, संभाजीराजे यांच्या नाशिकच्या विकासासंदर्भातील वक्तव्यातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची यापूर्वी डब्यात बंद झालेल्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे.

Sambhaji Raje
MCA Election : नार्वेकरांनी घेतली दुसऱ्या क्रमांकाची मते; विजयानंतर उद्धव ठाकरेंचा फोन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com