
मुक्ताईनगर : सत्ताधाऱ्यांकडून (Eknath Shinde Gruop) विरोधकांचा (Shivsena) आवाज दाबण्याचा प्रय्तन करून दडपशाही केली जात आहे. त्यांच्याकडे जनता व विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची सभा रद्द करून विरोधकांचा आवाज दाबण्यापेक्षा सुषमा अंधारे यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती, असा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सत्ताधारी नेते व मंत्र्यांवर केला आहे. (Instead of reject perission to meeting ruling party shoul Answer Sushma Andhare`s Questions)
खडसे म्हणाले, गेली तीस वर्षे मतदारांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तीस वर्षांत सर्व जाती धर्माला घेऊन सर्वसमावेशक विकासाचे राजकारण केले. राजकारण करताना कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु आजकालचे राजकारण बदलले आहे. सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे यांची सभा होऊ दिली नाही.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेच्या ३२ व्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द, हरताळा येथे माजी महसूल मंत्री खडसे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद सभा झाली. याप्रसंगी आमदार खडसे म्हणाले, की मतदारसंघात अनेक विकासकामे केली.राहिलेली विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी आतापर्यंत जशी साथ दिली ती साथ कायम राहू द्या, असे त्यांनी आवाहन केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ, यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, बंगालीसिंग चितोडिया, तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रदीप साळुंखे, समाधान कार्ले, यात्रा सह प्रमुख रामभाऊ पाटील, अतुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.