NCP news; सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये हा महाराष्ट्रद्रोहच

महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधातील हल्लाबोल मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे
Sameer bhujbal
Sameer bhujbalSarkarnama

नाशिक : गेले काही दिवस सत्ताधारी पक्षांतील (Ruling party) जबाबदार नेतेच राष्ट्रपुरुषांविषयी अवमानास्पद वक्तव्ये (Insulting statements) करीत आहेत. असे प्रकार कदापी सहन केले जाणार नाही. ही विधाने हा एक प्रकारे महाराष्ट्रद्रोहच (Maharashtra treason) आहे. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) हल्लाबोल होणाऱ्या मोर्चात प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी केले. (Mahavikas Aghadi perform a march against Ruling party)

Sameer bhujbal
Sureshdada Jain news; जैन आज जळगावात, भाजप नेते झाले सावध

शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मेट भुजबळ नॉलेज सिटीमध्ये झाली. यावेळी शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Sameer bhujbal
Eknath Shinde News; शिंदे गटाच्या झंजावाताने शिवसेना अलर्ट!

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, बेताल वक्तव्यातून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे मुंबईत शनिवारी (ता. १७) सकाळी दहाला हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळा येथील राणीचा बाग इथून निघणाऱ्या मोर्चात पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी समर्थकांसह सहभागी होण्याचे नियोजन करावे.

श्री. भुजबळ म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह इतर महापुरुषांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील जबाबदार नेत्यांकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. महापुरुषांचा व महाराष्ट्र राज्याचा होणारा हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात येत आहे. आझाद मैदानावर मोर्चाचा समारोप होईल. तालुकास्तरावरून नियोजन करून प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी मोर्चात सहभागी व्हावेत.

शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, माजी सभापती संजय बनकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, बाळासाहेब कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजूरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com