Dhule News: सत्ताधारी भाजपने महापालिकेत कोट्यवधी लाटले!

धुळे महापालिकेतील भ्रष्टाचार, शहरातील समस्यांप्रश्‍नी शिवसेनेचे पदाधिकारी सत्ताधारी भाजपविरोधातआक्रमक
Shivsena leaders in Dhule corporation
Shivsena leaders in Dhule corporationSarkarnama

धुळे : (Dhule) गेल्या चार वर्षांच्या महापालिकेतील सत्ताकाळात धुळेकरांच्या नजरेत भरेल असे एकही काम सत्ताधारी भाजपला (BJP) करता आले नाही. याविरोधात शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मंगळवारी महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले. (Shivsena aggresive on of BJP corruption in Dhule municipal corporation)

Shivsena leaders in Dhule corporation
Nashik; भाजपमध्ये मोठा गोंधळ, पदवीधरचा उमेदवारच ठरेना!

यावेळी अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालून शहरातील समस्यांचा पाढा वाचला. विकासाच्या नावाखाली केवळ शेकडो कोटी रुपयांचा चुराडा तेवढा झाला, बोगस कामे टाकून कोट्यवधींची बिले तेवढी काढली, नागरिकांना केवळ आश्‍वासने दिली, असा आरोप शिवसेनेने केला.

Shivsena leaders in Dhule corporation
Congress; ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासाठी चार वर्षांपासून फक्त दसरा, दिवाळी, आखाजी असे तारीख पे तारीख आश्‍वासन दिले जात आहे. या योजनेचे ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही. धुळेकरांना दोन-तीन दिवसांआड पाणीपुरवठ्यातही सत्ताधारी कमी पडले. पाण्याच्या नावाखाली भाजपच्या मंत्र्यापासून ते खासदार, नगरसेवकांनी आश्वासने दिली. नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात मात्र त्यांना अपयशच आले.

रस्त्यांची अवस्था बिकट

शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेकदा रस्त्यांवर रस्ते बनवून लाखो रुपयांचे बिले काढली गेली. वेळेवर धुरळणी, फवारणी होत नसल्याने डासांच्या समस्येने नागरिक हैराण आहेत. मलेरिया, डेंगीची साथ वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर अंकुश नसल्याने साथीचे आजार पसरत आहेत, गोवरची साथ हे त्याचे उदाहरण असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

चहूबाजूला उकिरडे

अद्यापही शहरातील ४० टक्के भागातील कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे शहराच्या चहूबाजूला कचऱ्याचे उकिरडे आहेत. ठेकेदाराने बोगस कंपनीचे पथदीप लावण्याने अर्धेअधिक शहर अंधारात असते. एकंदरीतच सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन तसेच सत्ताधारी भाजप अपयशी ठरले आहे. आता महापौर बदलले तरी समस्या ‘जैसे थे’च राहणार असून, फक्त टक्केवारी घेणे, बिले काढणे आणि विकासाच्या नावाने पत्रकबाजी करणे एवढीच कामे सत्ताधारी करू शकतात, असा आरोप शिवसेनेने केला.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देवीदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक नितीन शिरसाठ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in