रोहिणी खडसे म्हणतात, `मतदारसंघात महिला सुरक्षित नाही`

बोदवडचा वाद शमण्याआधीच मुक्ताईनगरात शिवसेना-राष्ट्रवादीत नवा वाद सुरु झाला.
Adv. Rohini Khadse

Adv. Rohini Khadse

Sarkarnama

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पोस्टवरून शिवसेनेचे कार्यकर्ते त्याच्या घरावर चालून गेले. महिलेच्या अंगावर धावून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मतदारसंघातील महिला सुरक्षित नसल्याचे ट्वीट करत प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटलांना (MLA Chandrakant Patil) चोप देण्याची भाषा केल्याने मुक्ताईनगरमध्ये (Muktainagar) शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दीक वॅार सुरु झाले आहे.

<div class="paragraphs"><p>Adv. Rohini Khadse</p></div>
जिल्हा बँकेचा गुलाल उतरण्याआधीच शिवसेना, राष्ट्रवादीत जुंपली!

बोदवड नगर परिषद निवडणुकीनिमित्ताने मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील वाद कमालीचा पेटला आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांनी खडसे पिता-पुत्रीकडून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

<div class="paragraphs"><p>Adv. Rohini Khadse</p></div>
रुपाली चाकणकरांना मिळालं 'ख्रिसमसचं गिफ्ट'

यासंदर्भात पीडित महिलेचे पती राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी असून, त्यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर केली होती. त्याचा राग आल्याने शुक्रवारी रात्री १०.२२ ला ईश्वर हटकर याने महिलेच्या पतीला फोन करून धमकी दिली. रात्री साडेदहाला ईश्वर हटकर घरासमोर येऊन मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करीत ठार करण्याच्या धमक्या देत होता. ‘आम्ही आमदार चंद्रकांत पाटलांची माणसे आहोत’ असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. त्याच वेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुनील पाटील त्याठिकाणी आले आणि खडसेंच्या नावाने शिवीगाळ करून ‘ईडी’चे दोन कोटी कुठे गेले, असे म्हणू लागला.

घराबाहेर गर्दी असल्याने पीडितेने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी ॲड. रोहिणी खडसे यांना फोन केला. काही वेळाने त्यांच्यासह दोघे आल्याने सुनील पाटील आणि ईश्वर हटकर नरमले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस अधिकारी प्रदीप शेवाळे तपास करीत आहेत.

बोदवड निवडणुकीनिमित्ताने शिवसेनेचे काही पदाधिकारी माझ्या अंगावर धावून आले होते. मात्र ॲड. रवींद्र पाटील पुढे आल्याने मी बचावले. सोशल मीडियात कुणी काय पोस्ट करावे हा ज्याचा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आमच्या विरोधातही अनेक पोस्ट येत असतात. एखाद्या महिलेवर भररस्त्यावर अन्याय होत असेल, तर यापुढे महिला शांत बसणार नाही.

- ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर

...

मी आमदार झाल्यापासून एकनाथ खडसे व त्यांची कन्या रोहिणी खेवलकर माझ्याविरोधात कटकारस्थान रचत आहे. गेल्या वेळीही त्यांनी माझ्याविरुद्ध खोटे आरोप केले. मतदारसंघात अवैध धंदे कुणाचे आहेत, हे सर्वांना माहीत आहे. खडसे पिता-पुत्रीपासून आपल्या जीविताला धोका असून, याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याकडे तक्रार केली आहे.

- चंद्रकांत पाटील, आमदार, मुक्ताईनगर

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com